डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम.
![]()
डोंबिवली येथील के.एम.पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त विविध कार्यक्रम.


ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डोंबिवली येथील मातृश्री काशीबाई मोतीलाल पटेल वरिष्ठ महाविद्यालयात विविध प्रकारच्या स्पर्धा ,आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. जिमखाना कमिटीचा सहकार्याने व एन. एस. एस. युनिट यांच्या संयुक्त विद्यमानाने मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिपित्यर्थ महाविद्यालयात क्रीडा दिन साजरा करण्यात आला . क्रिडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. माधुरी नंदरवार मॅडम यांनी, विद्यार्थ्यांनी खेळताना आरोग्य विषयक काळजी घेणे आवश्यक आहे असा सल्ला दिला. खेळ आणि अभ्यास याचा संतुलन कसं साधता येतं हे सांगितले.तसेच क्रीडा मार्गदर्शक प्रा. अनंत उतेकर यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत, खेळाडूंनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी नियमित व्यायाम,योगासने आणि प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडतांना सांगितले की आपल्या महाविद्यालयातील खेळाडूंनी या वर्षी उत्कृष्ट खेळ कौशल्य दाखऊन प्रतिष्ठा,आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत असे आव्हान प्रा.उतेकर यानी केले. कॉलेजचा माजी विद्यार्थी सागर राणे यांनी खेळाचे महत्व व कॉलेज प्रती असलेली खेळाचे महत्व बोलून दाखवले . तो हॉलीबॉल चा उत्कृष्ट खेळाडू आहे त्याने युनिव्हर्सिटी इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये पारितोषिकही मिळवलेले आहेत. या कार्यकमात सर्व खेळाडू, एनएसएस युनिटचे सर्व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झालेले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. करिष्मा पाटील यांनी केले प्रा. सनी पंजाबी यांनी उपस्थीत मान्यवर आणि खेळाडूंचे आभार व्यक्त केले.

