धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !…
![]()
धरणगाव तालुका शासकीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न !…
जि.प.सदस्य प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते हाॅकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन !..



धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर
धरणगांव – दिनांक २८ व २९ ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे धरणगाव तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे घेण्यात आल्या स्पर्धेचे उद्घाटन दि.२८ रोजी जी पी एस कॅम्पस चे अध्यक्ष श्री विक्रम गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते मैदानाचे पुजन करून व श्रीफळ वाढवून करण्यात आले पहिल्या दिवशी १४ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या व १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या स्पर्धा पार पडल्या तर दुस-या दिवशी २९ तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून १७ वर्षं वयोगटाच्या स्पर्धेचे उद्घाटन जि.प.सदस्य श्री प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते हाॅकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीक्लब आॅफ जळगाव स्टार्स चे अध्यक्ष श्री.धनराज गोपालजी कासट तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. कंखरे सर इंग्लिश मीडियम चे प्रिंसिपल श्री.सचिन पाटील सर वरिष्ठ मा.वि.चे प्राचार्य श्री.यु के फासे सर कनिष्ठ मा. वि.चे प्रचार्य श्री सुनिल खंडागळे सर वरिष्ठ शिक्षक श्री. एस.एन.चौधरी सर, श्री. डी एस पाटील सर यांच्या उपस्थित करण्यात आले प्रास्ताविक क्रीडा समन्वयक श्री सचिन सूर्यवंशी सर यांनी केले स्पर्धेच्या नियमांविषयी माहिती श्री.डी एन पाटील सर यांनी दिली या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात गुड शेपर्ड विद्यालयाच्या मुलांचा संघ तर पथराळ विद्यालयाच्या मुलींचा संघ विजयी झाले १७ वर्ष वयोगटात मुलांचा जी.पी.एस हायस्कूल पाळधी तर मुलींचा बी.जे. विद्यालय अनोरे विद्यार्थ्यांचा संघ विजयी झाले १९ वर्ष वयोगटात ए.सी.ए. काॅलेजने बाजी मारली
संपूर्ण स्पर्धा तालुका क्रीडा समन्वयक श्री सचिन सूर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या या स्पर्धेत पंच म्हणून श्री एम डी परदेशी सागर मणियार सर डी एन पाटील सर राकेश धनगर सर अमोल सोनार ए ए पाटील आहेरे सर राजेश पावरा सर यांनी काम पाहिले गुणलेखक म्हणून श्री कायंदे सर जितेंद्र ओस्तवाल आर बी महाले हेमंत माळी वाय ए पाटील रायगडचे सर ए एम जयकारे सर बोरसे सर डी एस पाटील सर शुभम भोई सर यांनी काम पाहिले
स्पर्धेत १४,१७ व १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींनी सहभाग नोंदविला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक एम डी परदेशी सर यांनी केले तर आभार जी. पी.एस चे क्रीडा शिक्षक श्री राकेश धनगर सर यांनी मानले स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी परिश्रम घेतले बळीराम भाऊ यांनी अनमोल सहकार्य केले..

