1 min read

माणुसकी व्हाँट्सअॕप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना औषधी व साड्या भेट .

Loading

माणुसकी व्हाँट्सअॕप ग्रुप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी बांधत महिला रूग्णांना औषधी व साड्या भेट .

सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व रामभाऊ पांडुरंग कल्याणकर बहुद्देशिय सेवाभावी संस्था व ज्युनिअर चार्ली फाँडेशन ने राबवला स्तुत्य उपक्रम

धागा शौर्य की, राखी अभिमान की या म्हणी प्रमाणे कुटूंब व नातेवाईकासोबत नेहमीच सण साजरे करतो.पण जिथे ऐखादी अनओळखी आर्थिक परीस्थितीने पिडलेली व रुग्णालयात अथंरुनाला खिळलेली बहीण रुग्णालयासारख्या कंटाळवाण्या वातावरणात आज राखीच्या दिवशी मी सण कसा साजरा करु या भावनेने तिचे मन काहूरलेले असते खिन्न असते तिथे माणूसकी समुहाची ही भावंड आजची राखी पौर्णिमा सालाबादा प्रमाणे दणदणीत साजरी करण्याचा चंग बांधून राख्या आणि साड्या घेऊन रुग्णालयात दाखल झाली. आणि मोठ्या आपूलकीने त्या अनोळखी स्रीला राखीचे बंधन बांधायला सांगून मायेने साडी आणि तिला आवश्यक असलेली औषधी भेट देऊन रुग्णालया सारख्या निरस वातावरण रसमय करण्याचे कार्य , माणूसकी समुहाची भावंड अनेक वर्षापासून करत आलेली आहेत, याही वर्षी त्याच उत्साहाने गरजवंत रुग्णांन सोबत सण साजरा करून त्याच्या चेहऱ्यावर हसू व आनंद व्दिगुणित करण्यात आला यासाठी शासकीय रुग्णालय घाटी येथील,प्रसूती वार्ड अस्थिव्यंग विभागामध्ये रुग्णालयातील महिला पेशंट ला एक राखी एक साडी या स्तुत्य उपक्रमा अंतर्गत साड्यांचे वाटप करण्यात आले आहे.व आवश्यक रुग्णांना औषधीसाठी १०० रु भेट देवून साड्या भेट दिल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले, माणुसकीचे दर्शन झाल्याचे समाधान वाटले.यावेळी ज्युनिअर चाँर्ली सोमनाथ स्वभावणे,यांनी देखील चार्लीचॕपलीनच्या मुक आणि मुख अभिनयातून राखी बांधून घेऊन रूग्णांचा आनंद व्दिगुणीत केला.चार्लीनी आपल्या मुखकलेतून हसवत रुग्णांना आत्मियतेने माणुसकीचे दर्शन घडवून देत मोठी धमाल केली.
एक महिला रूग्ण
वार्ड क्र २९ मध्ये अँडमीट आहे त्यांच महिलेच्या अश्रू अनावर आले त्या माऊलीने सांगितले की आम्ही रक्षाबंधन साजरे करत नाही परंतू आज अचानक माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच राखी बांधली व मला ओवाळणीची साडी मिळाली आज ही माणुसकीची टिम माझ्यासाठी भाऊ बनून आले ,हे माझ भाग्यच आहे, त्या ताईने डोळ्यातून आनंदाश्रू काढत भाऊ बहिनीच्या नात्याला नव्याने उजाळा दिल्याचे त्या महिला पेशंटनी भाऊक होत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

माणुसकी व्हाँट्सअॕप गृप व सु-लक्ष्मी चे अध्यक्ष सुमित पंडित यांच्या मानवीय विचारातून ह्या कार्याची सुरुवात झाली आहे, या उपक्रमाला अनेक शुभचितकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे ,त्यामुळे या उपक्रमाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दानशूर व्यक्ती ज्यात,रामेश्वर रेंगे,सचिन सानप,देशमाने साहेब,किरण आहेर पोलीस निरिक्षक, नालंदा लांडगे, सुदाम शिरसाठ,साहाय्यक पोलीस निरिक्षक,
उद्धव हाके,बोडखे साहेब,पोलीस उप निरिक्षक , घाटीचे गायनिक विभागाचे श्री भिंगारे साहेब, ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर, प्रा.शरद सोनवणे,
प्रविण सोनवणे, गणेश जाधव, विजय चौधरी,
द्वारकादास शामकुवर महाराष्ट्राचे महावस्त्र दालन,
यावेळी माणुसकी समुहाचे ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे,भरतभाऊ कल्याकर,लक्ष्मण शिंदे,उमाकांत वैद्य,अनिश रामपुरे,रोहित गव्हाणे,राम पंडित सौ.पुजा पंडित, संगीता ईसनकर,

लक्ष्मी पंडित व माणुसकी समुहाच्या सभासदांनी परीश्रम घेतले.

” संवादातून जाणून घेतल्या रुग्णाच्या समस्या”

आगामी काळात अशा समस्यांवर मदत करावी या दृष्टीने प्रयत्न माणुसकी समुहातर्फे केला जातोय.
आज माणुसकीहिन झालेल्या ह्या समाजाला
समाजसेवक सुमित पंडित हे आज एक जीवंत उदाहरण आहेत.रूग्णांना आपुलकीने कोणीतरी चौकशी केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले” या प्रसंगी जिन्सी पोलिसठाण्याचे पोलिस निरिक्षक रामेश्वर रेंगे यांनी माणूसकी वाट्सअॕप ग्रुप,व माणूसकी समुह यांचे प्रमुख सुमित पंडीत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेऊन रुग्णांच्या चेह-यावर आनंद फुलविला याचे करावे तेवढे कौतुक कमीच पडेल त्यांनी या उपक्रमा बद्दल आभार व्यक्त केले .

………..रामेश्वर रेंगे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जिन्सि औरंगाबाद शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *