अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला आर के प्रीमियर लीगचा थरार
![]()



अयान मल्टीस्पोर्ट्स वर संपन्न झाला आर के प्रीमियर लीगचा थरार
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
वर्षभरापासून अयान टर्फ ढेकू रोड, अमळनेर येथे सुरू असलेल्या आर के प्रीमियर लीग ची शेवटची मालिका संपन्न झाली. यात वर्षभरात वीस क्रिकेट मालिका खेळवल्या गेल्या. त्यात एक दिवसीय आणि टेस्ट या दोघही क्रिकेट प्रकारांचा समावेश होता. शंभरहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
आर के समूहाचे अजितेम पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजन केले व त्याला वेद पाटील, मनीष बोरसे, विवेक भदाणे, गौरव वानखेडे आणि निलेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले. वर्षभर चाललेल्या आर के प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक मालिका जिंकण्याचा विक्रम अनुक्रमे जय गिरासे, विवेक भदाणे, गौरव वानखेडे आणि वेद पाटील यांनी केला त्याबद्दल त्यांना अजितेम पाटील, मनीष बोरसे आणि अनिकेत पवार यांच्याकडून गौरविण्यात आले. लवकरच पुढील सीजन सुरू करणार असल्याची घोषणा आयोजन समितीने केली.

