मानवसेवा ग्रुपचा माध्यमातून सुंदरकांड महिला मंडळातर्फे कातकरी आदिवासी पाड्यात रक्षाबंधनानिमित्त मिष्टान्न भोजन वाटप.
![]()
मानवसेवा ग्रुपचा माध्यमातून सुंदरकांड महिला मंडळातर्फे कातकरी आदिवासी पाड्यात रक्षाबंधनानिमित्त मिष्टान्न भोजन वाटप.


ठाणे,कल्याण(प्रतिनिधी ) रक्षाबंधन सणानिमित्त मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुप चा माध्यमातून, सुंदरकांड पाठ महिमा ” पठण ग्रुप , चां श्रीमती ज्योती पुजारा, रक्षा तन्ना, बिना सूचक,सरिता बेन,सुंदरकांड ग्रुपचा सर्व महिला मंडळातर्फे, रक्षा बंधनाच्या निमित्ताने दिनांक ३० ऑगस्ट २०२३ ,बुधवार रोजी,सकाळी ९ वाजता ,दुर्गाडी चौकातील , आदिवासी, कातकरी वस्तीत पूरी भाजी,गुलाबजाम असे ३०० लोकांना गोड जेवण वाटप करण्यात आले, यावेळी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील, स्वामीनारायण हॉल चे दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक उद्योजक डॉ रामचंद्र देसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, पोलिस पाटील संघाचे सोमनाथ ठाकरे, राजस्थान नामदेव समाज सचिव नटवर वर्मा,श्रीमती अरूना बेन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, उपस्थित सर्व मान्यवरांना, आणि तेथील बंधू भगिनींना मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांनी रक्षाबंधनाचा हार्दिक शुभेच्छा दिल्या व आभार व्यक्त केले.

