आश्रमशाळा पिंपळे बु. येथील शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा
![]()
दि.- 29 ऑगस्ट 2023 रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, यशवंत माध्य व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु.ता-अमळनेर, जि- जळगाव येथील शैक्षणिक संकुलात *"राष्ट्रीय क्रीडा दिवस"* उत्साहात साजरा करण्यात आला. भारताला ऑलिम्पिकमध्ये तीनदा सुवर्णपदक मिळवून देणारे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे व विविध खेळातील साहित्याचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री.उदय पाटील व प्रमुख पाहुणे श्री.उदय गुलाबराव पाटील,श्री.चेतन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक स्वप्नील एच.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मेजर ध्यानचंद यांच्या कार्याविषयी माहिती दिली व क्रीडा समिती मार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अमळनेर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व भद्रा प्रतिक फर्निचर, इलेक्ट्रॉनिक मॉलचे संचालक अण्णासो श्री.प्रताप साळी, आबासो श्री.दीपक साळी व अक्षय साळी यांच्या सौजन्याने आश्रमशाळेतील खेळाडूंना एकूण 30 टी-शर्ट प्राप्त झाले. व मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना वाटप करण्यात आले. यासाठी उच्च माध्यमिक शिक्षक स्वप्नील एच.पाटील, श्री. हेमंत पाटील व श्रीमती माधुरी पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे छायांकन श्री.प्रवीण पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा माईसो श्रीमती विद्याताई पाटील व सचिव नानासो श्री.युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व टी- शर्ट उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री भद्रा प्रतीक मॉलचे संचालक यांचे आभार व्यक्त केले.


