देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !…संगित खुर्ची, लिंबू चमचा,कबड्डी गोणपाट, रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न..
![]()
देवगाव देवळी हायस्कूलमध्ये राष्ट्रीय खेळ दिन उत्साहात साजरा !…
संगित खुर्ची, लिंबू चमचा,कबड्डी गोणपाट, रस्सीखेच स्पर्धा उत्साहात संपन्न..
अमळनेर प्रतिनिधी- सुवर्ण महोत्सव निमित्ताने महात्मा फुले हायस्कूल देवगांव देवळी ता.अमळनेर येथे राष्ट्रीय खेळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक ईश्वर महाजन यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन होते.क्रिडा शिक्षक अरविंद सोनटक्के,
स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी,एस.के.महाजन यांनी विद्यार्थ्यांना खेळाच्या संदर्भात माहिती दिली.
यावेळी शाळेतील सत्तर विद्यार्थी वेगवेगळ्या खेळात सहभागी झाले. मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी शासनाच्या परीपत्रकानुसार राज्यात क्रिडा सप्ताह आयोजित केला आहे. हे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य द्यावे असे सांगितले.
विविध खेळात खालील विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त झाले.
संगीत खुर्ची
वैष्णवी श्याम पाटील इयत्ता आठवी
अमर वसावे इयत्ता नववी
रोहीत पोरबा तडवी इयत्ता दहावी
लिंबू चमचा
मयुरी महाजन इयत्ता नववी
निशा जाधव इयत्ता आठवी
तन्मय बैसाणे इयत्ता आठवी
संकेश वसावे इयत्ता नववी
चैतन्य साईनाथ इयत्ता नववी
कबड्डी स्पर्धा
इयत्ता नववी संघ विजयी
गोणपाट स्पर्धा
निशा जाधव इयत्ता आठवी
क्रिष पाटील इयत्ता आठवी
रोहीत तडवी इयत्ता दहावी
रस्सीखेच स्पर्धा
इयत्ता नववी संघ विजयी

वरील सर्व विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.





