डोंबिवलीत पुरस्कार नाट्य अकादमी चां संकल्पनेतून” “वैकुंठनायका” नाटकाद्वारे विठूरायचे दर्शन.
![]()
डोंबिवलीत पुरस्कार नाट्य अकादमी चां संकल्पनेतून” “वैकुंठनायका” नाटकाद्वारे विठूरायचे दर्शन.



ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) पुरस्कार डान्स अकादमी ही गेली 22 वर्ष डोंबिवली मध्ये कथ्थक आणि पारंपरिक लोकनृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या संचालिका कथक नृत्यविशारद सौ. सुस्मिता विवेक ताम्हनकर यांच्या संकल्पनेतून सावित्री बाई फुले नाट्यगृहात 27 ऑगस्ट 2023 रोजी “वैकुंठनायका” हा दोन अंकी नृत्य नाट्य स्वरूपातील विठ्ठलमय प्रवास प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.
या कार्यक्रमाची संकल्पना तसेच नृत्य दिग्दर्शन सौ. सुस्मिता ताम्हनकर यांचे होते तर नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि प्रकाशयोजना कु. युवराज ताम्हनकर याची होती.
कार्यक्रमात एकूण 80 कलाकारांचा सहभाग होता आणि केवळ लहान मुलीच नाहीत तर वय वर्ष 5 ते वय वर्ष 58 पर्यंतचे पुरस्कार अकादमीचे विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होते.
रखू या नाटकातील नायिकेचा जन्मापासून ते वैकुंठापर्यंतचा प्रवास या नृत्यनाटिकेतून प्रेक्षकांसमोर नृत्याद्वारे आणि अभिनयाद्वारे उलगडत होता.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, हार्मोनियम वादक श्री. विघ्नेश जोशी उपस्थित होते. त्याच बरोबर श्री. माधव जोशी,दर्शना सामंत मॅडम, गुलाब वझे, दीपाली काळे, मीना गोडखिंडी, लीना ओक मॅथ्यू, उपस्थीत होते.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख,आर.एस.पी. चे डॉ.मनिलाल शिंपी यांनी कार्यक्रमाचा शेवटी सर्व कलाकारांचे कौतुक आणि अभिनंदन करत ,१००० रुपयाचे रोख बक्षीस पुरस्कार नाट्य संस्थेचा संचालिका श्रीमती सुस्मिता ताम्हणकर यांना दीले.अश्या मान्यवरांचां उपस्थितीत कार्यक्रमाला खूप रंगत आली.५०० चा पेक्षा जास्त दर्दी प्रेक्षकांनी मनमुरादपणे भक्तिमय वातावरणात प्रत्यक्ष पांडुरंगाचा दरबारात हजेरी लावल्याचा आनंद व्यक्त केला. बाईपण भारी बाई या लोकप्रिय चित्रपटाचे कलाकार ,शाहीर विवेक ताम्हणकर यांनी सर्व प्रेक्षकवर्ग, मान्यवर,आणि खास करून कार्यक्रम अतिशय सुंदर आणि मनमोहक,उल्लेखनीय भूमिका सादरीकरण करून सर्वांचे मनोरंजन करत भक्तिमय वातावरण निर्माण करणारे कलाकारांचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

