1 min read

प्रताप महाविद्यालयात चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेसाठी “ग्रँड सॅल्यूट टू इसरो चे आयोजन”

Loading

प्रताप महाविद्यालयात चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेसाठी “ग्रँड सॅल्यूट टू इसरो चे आयोजन”

अमळनेर : येथील खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात चंद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या सानेगुरुजी सभागृहात दि. २९ रोजी सकाळी ११ वाजेला प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या अध्यक्षतेखाली इस्त्रोला ग्रँड सॅल्यूट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे झूम मिटिंगद्वारे ऑनलाईन आयोजन करण्यात आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. ज. दि. लेकुरवाळे यांनी ऑनलाइन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर सकाळी ११:०५ वाजेला कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी शुभेच्छा दिल्या व चांद्रयान 3 च्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इस्रोतील संशोधकांचे कौतुक केले. नव्या पिढीसाठी असे संशोधन प्रेरणादायी ठरणारे आहे. आपल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनीही असेच संशोधनात सहभागी होऊन वैज्ञानिक प्रगती करावी असे आवाहन केले.
भारत हा चंद्रावर यान उतरवणारा चौथा व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा प्रथम देश ठरल्याबद्दल महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी इस्रोच्या संशोधकांना ग्रँड सॅल्यूट केला. त्याच्यानंतर सामूहिक राष्ट्रगीताचे गायन केले व देशभक्तीच्या घोषणा दिल्या.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. एच. निकुंभ, डॉ. जे. बी. पटवर्धन, प्रा. डॉ. कल्पना पाटील, डॉ. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे उपस्थित होते. यावेळी सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. मुकेश भोळे यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. तुषार रजाळे, व सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रवी बाळस्कर व महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. वंदना भामरे यांनी केले. तर प्रा. डॉ. धनंजय चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *