प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
![]()

प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा
विविध स्पर्धांचे आयोजन
अमळनेर : येथील खा.शि मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे आज दि. २९ ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते क्रीडा विभाग फलकाचे अनावरण करण्यात आले, त्यानंतर प्रतिमा पूजन केले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडूंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन हे होते. त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे व खेळाच्या साहित्याचे पूजन केले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हटले की, “ सर्व प्राध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे असलेले विशेष महत्त्व अधोरेखित केले. त्याचबरोबर महाविद्यालयातील विविध खेळांसाठी व आधुनिक सुविधांची अधिक पूर्तता केली जाईल असे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. तसेच महाविद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट खेळाडूंना मेजर ध्यानचंद क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाईल अशी घोषणाही केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. संदीप नेरकर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी मेजर ध्यानचंद यांच्या हॉकीच्या कारकीर्दविषयीसह “मानवाच्या व्यक्तिगत जीवनात खेळाचे असलेले विशेष महत्त्व अधोरेखित केले. तसेच खेळामुळे शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यदेखील टिकून राहते” असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. एच. निकुंभ, प्रा. डॉ. कल्पना पाटील, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, प्रा. उल्हास मोरे, प्रा. आर. एम. पारधी, जिमखाना प्रमुख व सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर, कुलसचिव आबासाहेब मैराळे,कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे
विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्ताने बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस इत्यादी क्रीडा प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संयोजन वरिष्ठ क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, कनिष्ठ विभागातील क्रीडा संचालक प्रा. अमृत अग्रवाल, योग शिक्षिका प्रा. अर्चना पाटील, सचिन वाघ, जगदीश शिंगाने, सर्व जिमखाना समिती सदस्य, खेळाडू यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृत अग्रवाल यांनी केले.
स्पर्धेचा निकाल
बॅडमिंटन पुरुष – सुवर्ण – प्रा. डॉ. संदीप नेरकर, रौप्य- डॉ. अमोल मानके, कांस्य – डॉ. एस. डी. बागूल, आणि डॉ. सुरळकर.
बॅडमिंटन महिला – सुवर्ण – प्रा. अर्चना पाटील, रौप्य – प्रा. डॉ. कल्पना पाटील, कांस्य- प्रा. प्रियांका बोरसे
कॅरम पुरुष – सुवर्ण -डॉ. रवी बाळसकर, रौप्य – डॉ. संतोष दिपके, आणि प्रा. पराग पाटील, कांस्य – हर्षल सराफ आणि डॉ. विवेक बडगुजर.
कॅरम महिला – सुवर्ण – चित्रा मलेला, रौप्य- प्रा. डॉ. प्रियांका पाटील, कांस्य- हेमलता सूर्यवंशी.
टेबल टेनिस पुरुष – सुवर्ण – योगेश तोरवणे, रौप्य- हेमंत पवार व प्रा. किरण भागवत, कांस्य प्रा. किरण सूर्यवंशी व प्रा. सुनील राजपूत
टेबल टेनिस महिला – सुवर्ण – डॉ. नलिनी पाटील, रौप्य – प्रियंका अवित पाटील, कांस्य – प्रा. मनीषा मोरे.
बुद्धिबळ पुरुष – सुवर्ण – प्रा.आर. एम. पारधी, रौप्य- डॉ. दीपक पाटील, कांस्य – प्रा. अवित पाटील आणि डॉ. नीलेश पवार.
बुद्धिबल महिला – सुवर्ण – प्रा. डॉ. पुष्पा पाटील आणि प्रा. वैशाली महाजन, रौप्य- प्रा. भाग्यश्री जाधव, कांस्य- प्रा. वैशाली राठोड..
कर्मचारी स्पर्धा –
टेबल टेनिस – सुवर्ण – अजय साटोटे, रौप्य- विजय ठाकरे , कांस्य- भटू चौधरी.

