1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आगळीवेगळी रक्षाबंधन

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात आगळीवेगळी रक्षाबंधन
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात राष्ट्रीय हरित सेने तर्फे एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून घरून राख्या बनवून आणल्या व परिसरातील झाडांना बांधल्या. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात झाड आपले व आपल्या पर्यावरणाचे रक्षण करते तर आपण सुद्धा त्यांचे रक्षण व संरक्षण केलं पाहिजे असे प्रतिपादन गोपाळ महाजन यांनी केले. शुभांगिनी महाजन यांनी रक्षाबंधन सणाचे महत्त्व सांगितले व विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या विद्यालयातील मुलींचे रक्षण करावे असे आवाहन केले. पर्यवेक्षक एल. जे. पाटील व मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मिताली चौधरी फाल्गुनी कोल्हे गायत्री चौधरी, गायत्री सपकाळे , रूपाली सपकाळे, खुशी आहिरे,ममता चौधरी आदिती कोल्हे, मिताली भारुळे,पल्लवी कोळी, हर्षदा सपकाळे, चैताली वानखेडे, प्रज्ञा कापडणे,हेमांगी पाटील कधी विद्यार्थिनींनी राखी बनवल्या व आपल्या परिसरातील झाडांना बांधल्या.

Photo Caption :झाडाला राखी बांधताना गायत्री चौधरी सोबत पर्यवेक्षक एल. जे. पाटील,गोपाळ महाजन, प्रेमराज बराटे डी. जी.महाजन, के आर महाजन, शुभांगीनी महाजन भावना चौधरी, एच ए सोळुंके, मंगला नारखेडे, स्वाती वाघुळदे, मीनाक्षी कोल्हे,अनिता पाटील, चारुलता टोके,भारती पाटील, सिंधू मोरे,वृषाली चौधरी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *