1 min read

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विज्ञान मंडळ स्थापन

Loading

असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात विज्ञान मंडळ स्थापन
कार्यक्रमाची सुरुवात आठवीच्या विद्यार्थिनींनी विज्ञान गीताने केली कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद बागुल सर अध्यक्षस्थानी होते त्यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे त्यातूनच एखादा नवीन संशोधक निर्माण होतो असे मनोगतातून सांगितले विद्यार्थ्यांमधून विज्ञान मंडळ अध्यक्ष म्हणून कुमारी हेमांगी पाटील ,तसेच दक्ष कोल्हे, गायत्री चौधरी ,यश पाटील योजना वाणी, तृप्ती बिराडे कोमल नारखेडे ,प्रज्ञा कापडणे ,मोहिनी पाटील, दुर्गेश चिरमाडे यांची विविध पदांवर निवड करण्यात आली
यावेळी पर्यवेक्षक एल जे पाटील सर, गोपाळ महाजन हेमलता सोळंके ,वृषाली चौधरी ,संतोष कचरे चारुलता टोके ,उपेंद्र चौधरी उपस्थित होते
सूत्रसंचालन विज्ञान समिती प्रमुख प्रेमराज बऱ्हाटे तर आभार सचिन जंगले यांनी मांडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *