स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज) जळगाव येथे विज्ञान मंडळाचे प्रा. डि.एस.भारंबे यांच्या हस्ते उद्घाटन.
![]()


स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. स्वायत्त कॉलेज) जळगाव येथे विज्ञान मंडळाचे प्रा. डि.एस.भारंबे यांच्या हस्ते उद्घाटन.
जळगाव: स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय (एम.जे. कॉलेज) जळगाव येथे मराठी विज्ञान परिषदेचे सचिव ज्येष्ठ संशोधक प्रा. श्री.दिलीप भारंबे यांच्या हस्ते विज्ञान मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रा.श्री.भारंबे सरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रयोगातून विज्ञान हा प्रयोगात्मक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे प्रबोधन केले. तसेच त्यांनी सेंटर ऑफ मास, सायफान मेथड, लॉ ऑफ इनर्शिया, न्यूटन्स लॉशी संबंधित प्रयोग अतिशय सोप्या पद्धतीने करून दाखविले. त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले की, आपल्या दैनंदिन व्यवहारात आढळणारे अनेक प्रयोग हे विविध वैज्ञानिक सिद्धांताला व नियमाला अनुसरून असतात. त्यासाठी आपली निरिक्षण शक्ती व पृथःकरण कौशल्य हे जागृत ठेवणे अत्यावशक आहे. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती ब-हाटे, प्रा.उमेश पाटील प्रा.प्रसाद देसाई व विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. घनश्याम सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वीणा भोळे, प्रास्ताविक प्रा.घनश्याम सोनवणे, आभारप्रदर्शन प्रा.प्रमोद भोई यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.शोभना कावळे, डॉ.अतुल इंगळे, प्रा.स्वप्ना पाटील ,प्रा. संदिप वानखेडे, प्रा.जयंत इंगळे व प्रा.चारुलता बेंडाळे यांनी परिश्रम घेतले.

