1 min read

डॉअनिल शिंदे यांच्या तर्फे सोळा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Loading

डॉ अनिल शिंदे यांच्या तर्फे सोळा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

डॉक्टर अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन, अमळनेर व कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने 16 रुग्णांचे मोतीबिंदूचे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

18 ऑगस्ट 2023 रोजी बहादरपुर येथे सर्व रोग निदान शिबिर नर्मदा मेडिकल फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आले होते. यात सोळा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली. या रुग्णांना डॉक्टर अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाने नंदुरबार येथे मोफत शस्त्रक्रिया करून सुखरूप आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी पुन्हा बहादरपूर येथे सोडण्यात आले.

सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ संदीप जोशी, डॉ मयुरी जोशी, डॉ महेश पाटील, डॉ गुणवंत कोळी, डॉ उमाकांत बारी, डॉ झाकीर शेख, डॉ परेश पाटील, डॉ हर्षल, गणेश पाटील, कुणाल पाटील, जयश्री ठाकरे आदींनी परिश्रम घेतले.

मोफत शस्त्रक्रिया व उत्तम व्यवस्था झाल्याने रुग्णही सुखावले होते व त्यांनी डॉक्टर अनिल शिंदे यांचे आभार मानले.

बहादरपुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश पारोचे, डॉ प्रवीण पवार, डॉ चंद्रकांत देसले, डॉ चिमणपूरे , डॉ विशाल बडगुजर यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *