विदयाविहार काँलनीत भव्य मिरवणूक व होमहवन उत्साहात संपन्न
![]()
विदयाविहार काँलनीत भव्य मिरवणूक व होमहवन उत्साहात संपन्न
विद्याविहार कॉलनीत विद्येश्वर महादेव
मंदिरात होणार आज स्थापना






अमळनेर प्रतिनिधी-विदयाविहार काँलनीत भाविकांचे श्रध्दास्थान विद्येश्वर महादेव मंदीराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने भव्य मिरवणूक व होमवहन पुजा करण्यात आले.यावेळी नितीन भावे महाराज,प्रशांत कुलकर्णी सह उपस्थित होते. सकाळपासून ते संध्याकाळ पर्यत ८ तास महापुजा मंदिरात संपन्न झाली. यावेळी परीसरातील भाविक बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीत विदयाविहार काँलनीतील महीला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत नाचत गाजत मिरवणूक तिन तास होती.संगीतमय वातावरणात महीला व पुरुष अत्यंत आनंदाने नाचण्याच्या तालावर ठेका धरला.लहाणापासून ते आबालवृद्ध पर्यत सर्वानी मिरवणुकीत उपस्थिती होती. विदयाविहार काँलनीतील भव्य व दिव्य विद्येश्वर महादेव मंदिर आहे.
यावेळी मिरवणूक व होमवहन पुजासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील, संजय पाटील, राहूल शिंपी, प्रविण वाघ,प्रविण गुजर,कल्पेश साळुंखे, राकेश गोसावी, सुनील शिंगाणे,मधुकर देसाई, जयंत पाटील, भरत पाटील,संजय पाटील, अशोक जाधव,कपील पाटील, राज वाणी विजय येवले,मातोश्री मंडपाचे विनोद पाटील यासह अनेक बंधू व भगिनी यांनी सहकार्य केले.
आज होणार होमवहन व स्थापना
विद्या विहार कॉलनीतील विद्येश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा
28-8-2023 सोमवार रोजी सकाळी महामण्डलेश्वर स्वामी हंसानन्द तीर्थजी महाराज कपिलेश्वर मंदिर निम, अमळनेर यांच्या हस्ते कळस लावणे तसेच दुपारी 12 वाजता प्राणप्रतिष्ठा आहे.तरी परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

