1 min read

कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा गुणगौरव सोहळा व सामाजिक मेळावा उत्साहात संपन्न.

Loading

कल्याण येथे खान्देश कुंभार समाजाचा गुणगौरव सोहळा व सामाजिक मेळावा उत्साहात संपन्न.

ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी): कल्याण येथे खान्देश कुंभार समाज कल्याणच्या वतीने,विद्यार्थी गुणगौरव सोहळा,आणि सामाजिक मेळावा श्री.सिद्धिविनायक हॉल,भोईरवाडी, कल्याण येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अनेक समाज बांधव उपस्थित होते.लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, आरोग्य तपासणी, विद्यार्थी गुणगौरव,करियर मार्गदर्शन अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. दिनेश खैरनार इस्रो येथील तंत्रज्ञ हे होते.तसेच भगवान सूर्यवंशी,महेश सायकर,रघुनाथ कुंभार,संदीप सोनवणे इ.प्रमुख पाहुणे होते.अध्यक्ष स्थानी मधुकर कुंभार हे होते.मंडळाचे अध्यक्ष रमेश मोरे,उपाध्यक्ष भगवान कुंभार,सचिव प्रकाश बोरसे,अशोक वाघ खजिनदार,अर्जुन बोरसे,देवानंद चव्हाण,विलास मोरे,.संदीप सोनवणे, सौ.महाले इ.मान्यवर मंचावर उपस्थित होते.सामाजिक बांधिलकी जपणे कसे महत्वाचे आहे,समाजातील विविध घटक एकत्र येऊन समाज उपयोगी कार्य केली पाहिजेत असे मत मान्यवरांनी मांडले.इस्रो चे दिनेश खैरनार यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.या मेळाव्यात रंगराव मोरे,नारायण महाले,नरेंद्र मोरे,जगदीश मोरे,राजाराम कुंभार,अर्जुन चव्हाण,शैलेश चव्हाण,चेतन मोरे,आत्माराम सोनवणे,विकास मोरे,विजय मोरे,जगदीश कुंभार,तुषार सोनावणे, गुलाब वाघ, कैलास कुंभार,कैलास वाघ,श्री.महाले,उमेश कुंभार याचे मोलाचे सहकार्य लाभले.समाजातील अनेक महिला,बंधू व मुले उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध चव्हाण,निता जगदाळे व कल्पना बोरसे यांनी केले.कल्याण परिसरातील जास्तीत जास्त समाज बांधवांनी यापुढे उपस्थित राहण्याचे आवाहन करून आभारप्रदर्शन भगवान कुंभार यांनी केले. प्रीती भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *