सम्राट अशोक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात इस्रो शास्त्रज्ञांचा प्रभात फेरीच्या माध्यमातून सन्मान.
![]()


सम्राट अशोक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात इस्रो शास्त्रज्ञांचा प्रभात फेरीच्या माध्यमातून सन्मान.
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी)- चंद्रयान तीन मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद सर्व भारतीयांना झाला . प्रसार माध्यमातून थेट प्रक्षेपण व वृत्तपत्र माध्यमातून प्रसिद्धीमुळे विद्यार्थ्यांपासून ते नागरिकांपर्यंत चंद्रयान तीन चा उत्साह वाढत गेला. कल्याण पूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयात चंद्रयान तीन मोहीम यशस्वी करणारे इस्रो शास्त्रज्ञ एम. शंकरण,येस. सोमनाथ, पी.वीर मुथूवेल, एस. उन्नीकृष्णन नायर, डॉ. के. कल्पना इत्यादी शास्त्रज्ञांचे छायाचित्र विद्यार्थ्यांनी हातात घेत पुष्प पाकळ्यांचा वर्षाव करत परिसरात ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढून ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान केला. इयत्ता चौथी ते इयत्ता दहावीच्या मुलींना good touch आणि bad touchया विषयावर मार्गदर्शन करण्यास आलेले कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा चव्हाण व पोलीस हवालदार रूपाली पाटील यांनी शास्त्रज्ञांचे कौतुक करत कार्यक्रमात सहभाग घेतला.विज्ञान शिक्षिका शोभा देशमुख यांनी चंद्रयान तीन ची माहिती विद्यार्थ्यांना दिली. चंद्रयान तीन मुळे भारताला होणारे फायदे सांगितले. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शिक्षकांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला.

