पिंपळे आश्रम शाळेत इस्रो ने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल आनंदोत्सव..
![]()

सॅल्यूट चंद्र मोहीमेला
आज पिंपळे आश्रम शाळेत इस्रो ने चांद्रयान 3 मोहीम यशस्वी केल्याबद्दल मानवी साखळीच्या माध्यमातून इस्रो मधील सर्व ज्ञात अज्ञात घटकांचे आभार मानण्यासाठी सॅल्यूट इस्रो अभिनव उपक्रम राबविण्यात आला. इस्रो ने केलेल्या कार्याचे श्री चिंतामणी शैक्षणिक संकुलाचे सचिव श्री युवराज पाटील यांनी अभिनंदन केले, भूगोल शिक्षक सतीश कागणे यांनी विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 मोहीम विषयी माहिती दिली, संस्थेचे सचिव श्री युवराज पाटील यांनी देशाभिमान तिरंगा ध्वज फडकवून राष्ट्रगीताद्वारे इस्रो बद्दल कृतज्ञता व्यक्त केली, भारत माता की जय , वंदे मातरम असा जयघोष करण्यात आला प्राथमिक मुख्याध्यापक श्री अविनाश अहिरे व माध्यमिक मुख्याध्यापक श्री उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाने व हेमंत पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मुकेश पवार , श्री संजू पवार श्री दीपक नांद्रे सौ सीमा चौधरी राहुल पाटील अविनाश पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले श्री चिंतामणी शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा सौ विद्या पाटील , श्री अभिजित पाटील यांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

