1 min read

खानदेशनी कानबाई लोकेसनी नवलाई, व
कानबाई रानबाई नी गौरांई!

Loading

खानदेशनी कानबाई लोकेसनी नवलाई, व
कानबाई रानबाई नी गौरांई!
वृत्तांकन::डॉ. मनिलाल शिंपी,( ठाणे,कल्याण)
पूर्वार्ध
कानबाई, रानबाई नी गौराई या खान्देशन्या कुल देवता सेत. पार्बती म्हणजे गौराई. गौरांईन मायर खान्देश से संकरजीं जवाई से खान्देशना. खान्देशमां गौरांईले जनझनी माय बी म्हणतस. जनझनी म्हणजे जगत जननी असा त्यांना अर्थ से. हाई गवराई चैतनी चांद्नी तिज ते वैशाग चांद्नी तिज लोंग एक महिना माहेरमां येस. म्हणजे आखाजी हाऊ माहेर वासीनना सन से. आखाजीले बठ्या पोरी मायरमां येतीस.
आखाजी जसा माहेर वासीनना सन से तसाज कानबाई हाऊ सासर वाशिनना सन से. बठ्या व्हवा कानबाईले सासरे जातीस. कानबाई हाई लक्ष्मी से नी ती व्हऊ से खान्देशनी. खान्देश हाऊ कान्हानी वसाडेल देश से. म्हणजे कान्हा आपला पूर्वज से. आपुन त्यांना वशिलामा जलमेल सेत. कान्हानी वसं आपुन सेत. म्हणजे घरना करता सवरता पोऱ्या हाई कान्हनं रूप से. त्या कान्हानी बायको म्हणजे कान्हबाई तीना अपभ्रश कानबाई से. ती कानबाई खान्देशनी व्हऊ से. कानबाई लक्ष्मीनं रूप से, हाई कानबाई म्हणजे धन दौलत पैसा अडका सोनं नाण. कान्हानी दुसरी बायको रानबाई. हाई रानबाई म्हणजे वनराई, म्हणजेज वन देवता. जंगल म्हणजे वावरनं धन पीकपानी, ती रानबाई. पीक पानीन पूजान रूप म्हणजे तुयसी. दोन्ही बी देवता कानबाई रानबाई घरे घर पुजातीस. तिसना नावे बराज सेत पन त्या दोनज सेत कानबाई, रानबाई.
लक्ष्मी तुळस
1 कानबाई रानबाई
2 रुखमाई राई
3 धनाई पुनाई
4 धनदाई पेडकाई
इसलेज आंध्रमां,
5 श्रीदेवी भुदेवी
म्हणतस. बालाजी म्हणजे बाळकृष्ण, विष्णू त्या बालाजींन्या या दोन बायका सेत. तिरुपती बालाजींमा या श्रीदेवी नी भुदेवी यांसन लगीन बालाजी संगे एकज दिन लावतस. पन आपला कडे न्यारा न्यारा दिनले लावतस. कान्हा याले कन्हेरे बी म्हणतस. कान्हा नी कानबाई यांसन लगीन लागता सरावनमां म्हणजे नागपंचमी व्हई सनी येनारा पहिला आयतवारले लावतस. नी कान्हा रानबाईन लगीन खोपडी एकादसना रोज लावतस. खान्देशमां दसराना दुसरा रोजे, गावेगाव बालाजीना रथ फिरावतस तो बालाजी म्हणजे बाळकृष्णज से. त्यांना आपुन वंशज सेत. संत कबीरना एक दोहा से गुरुग्रंथ साहेबमां.
राम जातीका रंगाडा, किस्ना जाती अहिर!
ब्रह्मा जाती किम्हार हैं, शिव जाती फकीर!
रामनी जात रंगडा म्हणजे राजपूत नी कृष्णनी जात अहिर से. ब्रह्मदेवनी जात कुम्हार से. कारण बठा सजीव या माटीना भांडा सेत त्या ब्रह्मा घडस. नी संकरजीं बठा आंगले भबूत लाई फिरस, जटा वाढाई फिरस तो गोसाई म्हणजे फकीर से. यामा एक लाईन्ग महत्वानी से, किसना जाती अहिर
भगवान श्रीकृष्णनी जात अहिर से. आपुन बी खान्देशी बठा अहिर सेत. अहिर सोनार, अहिर शिंपी, सुतार, न्हावी, चर्मकार, कुणीबी, गुजर, धनगर, माळी, कुंम्हारं. या बठा अहिर सेत. नी मंग अहिर लोके जीं भाषा बोलतंस ती भाषा अहिरवाणी. तीना अपभ्रश अहिरानी भाषा से. यांनाज अर्थ अहिरानी भाषा बोलतंस त्या बठा अहिर सेत. अहिरानी बोलनार कोनती का जात ऱ्हायना त्याना वस वशिला एकज से अहिर. कान्हा हाऊ बी अहिर से. काही लोक अहिर नी अभीर मां गडबड करी टाकतस. ते ऐकी लोके बी मंग बिचकी जातंस. नी मंग त्या बी इचाराले लागी जातंस आपुन नक्की कोन? अहिर का अभीर? काही बिचकू ईचकू नका. अभीर नी अहिर एकज से. मूळ संस्कृत सबद अभीर से, त्यांन प्राकृत रूप अहिर से. आते वापरमा अहिरज से. संस्कृत अभीर सबद लीना ते मंग अहिरानी भाषाले अभिरानी म्हनन पडी.
ते मुख्य विषय कानबाई हाई लक्ष्मी से ती खान्देशनी आंडेर नही व्हवू से. ती कशी ते दखवूत पुढला भागमा!
शब्दांकन: बापू हटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *