1 min read

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे नागझिरी केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन

Loading

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे नागझिरी केंद्र अंतर्गत शिक्षण परिषदेचे उत्कृष्ट आयोजन
“”””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथे नियोजित असलेली नागझिरी केंद्र अंतर्गत माहे- ऑगस्ट २०२३ ची ” शिक्षण परिषद ” आज दि. २५/०८/२०२३ रोजी उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षण परिषदेला उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापासूनच लेझिम तालावर समूहनृत्य सादर करत शाळेच्या विद्यार्थिनी कु. स्वाती ठाकरे, कु. हेमलता देसाई, कु. दिपाली ठाकरे, कु. सुहानी गावित, कु. राशी गावित, कु. राधिका गावित, कु. योगिता सुर्यवंशी, कु.अपर्णा ठाकरे यांनी स्वागत करत कार्यक्रम स्थळा पर्यंत सादरीकरण केले. सर्व मान्यवरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरून कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागझिरी केंद्र प्रमुख मा. श्रीमती बी. बी. अहिरे मॅडम यांनी धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष, मा.नानासाहेब तुकाराम बळीराम माळी, सचिव, मा. आप्पासाहेब एकनाथ बळीराम महाजन, नागझिरी केंद्र शाळा मुख्याध्यापक मा. चव्हाण सर व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, मा. गणेश तुकाराम माळी उपस्थित होते.
शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. व श्रीफळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात झाली. लगेचच शाळेच्या विद्यार्थिनी कु.स्वाती ठाकरे,कु.हेमलता देसाई,कु.सुहानी गावित,कु.दिपाली ठाकरे,मयुरी ठाकरे,कु. मनिषा ठाकरे यांनी तालबद्ध स्वरात ईशस्तवन व स्वागतगीत सादरीकरण केले‌. त्यानंतर सर्व मान्यवरांचा संस्थे मार्फत मुख्याध्यापकांनी श्रीफळ,नेपकीन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त ” ग्यान की संस्था पुणे व एबीपी माझा चॅनल मुंबई ” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ” पोस्ट कार्ड संदेश लेखन ” स्पर्धेतील विजेता विद्यार्थी चि. भावेश कोरे इ. ५ वी याचा केंद्र प्रमुख मा. श्रीमती बी. बी. अहिरे यांनी गौरव केला व मार्गदर्शक शिक्षक श्री. माळी के. एन. यांचाही सत्कार केला. यावेळी संस्थेचे सचिव मा‌.आप्पासाहेब एकनाथ बळीराम माळी, मुख्याध्यापक मा.गणेश तुकाराम माळी, विज्ञान शिक्षक श्री. के.एन.माळी यांनी मनोगते व्यक्त केली. शिक्षण परिषदेला नागझिरी केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.
शिक्षण परिषदेचे मुख्य विषय शैक्षणिक उपक्रम, अहवाल, पाठ नियोजन, अॅक्टिव्हिटी, शालेय पोषण आहार देयके, विविध परिपत्रक, नवभारत साक्षर निरक्षर सर्व्हे, शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे, शालेय समित्या, एफ. एल.एम. योजना, ऑनलाईन लिंक भरणे इ. अनेक विषयांवर केंद्र प्रमुख मा. बी. बी. अहिरे मॅडम यांनी सविस्तर चर्चा घडवून मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. शिक्षण परिषदेच्या आयोजनासाठी माध्यमिक शाळा ब्राम्हणवेलचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन कृतियुक्त उपस्थिती दिली.
सहशालेय समिती व सांस्कृतिक समिती प्रमुख कलाध्यापक, श्री. हिरामण सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. तर जि. प. शाळा ब्राम्हणवेलचे मुख्याध्यापक, श्री. लक्ष्मण बागुल सर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *