1 min read

गोपाल माळी यांची कळमसरे पोलिस पाटील पदी लागली वर्णी!!!

Loading

गोपाल माळी यांची कळमसरे पोलिस पाटील पदी लागली वर्णी!!!

महाराष्ट्र शासनातर्फे नुकतीच पोलिस पाटील भरती राबविण्यात आली त्यात कळमसरे पोलिस पाटील पदी गोपाल माळी यांची वर्णी लागलेली आहे, ते कळमसरे येथील आदर्श शेतकरी, श्री. हिरामण वामन महाजन (रामीकर) यांचे लहान चिरंजीव आहेत.
कळमसरे पोलिस पाटील पदासाठी एकूण 19 उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केलेली होती, त्यापैकी गोपाल माळी यांनी पोलिस पाटील पदासाठी झालेल्या लेखी परीक्षेत 80 पैकी 65 येवढे सर्वोच्च गुण मिळवुन आपल मानस राखला आहे.
कळमसरे वाशीयांना मितभाषी, सुशिक्षित, संयमी असे व्यक्तिमत्व असलेले पोलिस पाटील गोपाल माळी यांच्या स्वरुपात प्राप्त झालेल आहे, एकूण दोन टप्प्यात लेखी परीक्षा व मुलाखत अश्या दोन टप्प्यात पोलिस पाटील भरती प्रक्रिया करण्यात आली. प्रांताधिकारी महादेव खेडकर यांनी अगदी पारदर्शक पणे मुलाखतीचा टप्पा पार पाडला व आज अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली त्यात गोपाल माळी यांना मुलाखती मध्ये 20 पैकी 12 व लेखी परीक्षेत 80 पैकी 65 एकूण 77 मार्क मिळवून पोलिस पाटील पदी विराजमान होतील. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *