1 min read

शिक्षण विकास मंचच्यावतीने आगळावेगळा उपक्रम.

Loading

शिक्षण विकास मंचच्यावतीने आगळावेगळा उपक्रम.

मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शिक्षण विकास मंच, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गतवर्षीपासून या प्रश्नमंजुषेला सुरूवात झाली आहे. गतवर्षीपेक्षा या वर्षी मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा होता. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ४८२१स्पर्धकांनी सहभाग घेतला.
७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त घेतलेल्या प्रश्नमंजुषा राज्यस्तरीय स्पर्धेत शालेय गटात नगरचा महादेव खेडकर, महाविद्यालयीन गटात ठाण्याचा निरज पवार आणि खुल्या गटात नांदेडच्या रेखा कंगठीकर प्रथम पुरस्कार प्राप्त झाला

शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली.मराठी, इंग्रजी या दोन भाषेत झालेल्या स्पर्धेस राज्यातील विविध विभागातून भरघोस प्रतिसाद मिळाला.

तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डाॅ.शिवानी लिमये पुणे, राहुल प्रभु मुंबई, भाऊसाहेब उमाटे लातूर यांनी मदत केली. या सर्व प्रक्रियेची तांत्रिक बाजू अजित तिजोरे यांनी सांभाळली, समन्वयाचे काम डाॅ.माधव सूर्यवंशी व योगेश कुदळे यांनी केले.शिक्षण कट्टयाचे जिल्हा समन्वयक, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पूर्ण टीमने अतिशय उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला आणि स्पर्धकांना प्रोत्साहित केले.

७७ व्या भारतीय स्वातंत्र्यदिननिमित्त घेतलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल.

शालेय गट
१) महादेव देविदास खेडेकर. अहमदनगर – १५ गुण
२) भागवती विनायक केसरकर. मुंबई – १५ गुण
३) हर्षवर्धन महेश जाधव – सातारा – १५ गुण

महाविद्यालयीन गट
१) नीरज गंगाधर पवार – ठाणे- १५ गुण*
२) वेदांत विजय बर्डे – ठाणे- १५ गुण
३) सार्थक प्रमोद सताव- बुलढाणा- १५ गुण

खुला गट
१) रेखा मारुतीराव कांगथीकर – नांदेड- १५ गुण
२) श्री समाधान दगडूबा बोरुडे – जालना- १५ गुण
३) रेखा पाटील – रायगड – १५ गुण

शिक्षण विकास मंचाचे मुख संयोजक डॉ. वसंत काळपांडे यशवंतराव चव्हाण सेंटर,मुंबई यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यदिना निमित्ताने प्रश्न मंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *