1 min read

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हाईस आँफ मिडीया यांच्याकडून मुख्याधिकारी यांना निवेदन

Loading

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि व्हाईस आँफ मिडीया यांच्याकडून मुख्याधिकारी यांना निवेदन
अमळनेर तालुका प्रतिनिधी:-

आज मुख्याधिकारी सो. नगरपरिषद अमळनेर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मिडिया च्या वतीने पत्रकार बांधवांच्या निवासासाठी मोकळा भूखंड व पत्रकार भवन बांधकामकामी मोकळा भूखंड मिळावा तसेच पत्रकार भवन बांधकाम कामी भूखंड हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईस तोवर पालिकेच्या विविध व्यापारी संकुलातून सुस्थितीत असलेले एक संकुल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व वाईस ऑफ मीडिया यांच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून द्यावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद अमळनेर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपजी गायकवाड यांना दोन्ही संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयजी गाढेसर . विभागाचे सरचिटणीस रवींद्र मोरे तालुकाध्यक्ष .जयंतलाल वानखेडे ,कार्याध्यक्ष समाधान भाऊ मैराळे,तालुका सचिव सुरेश कांबळे सहप्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे ,विक्की जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *