ब्राम्हणशेवगे येथे पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम..
सारीची रक्षा झाडांना देत स्मशानभूमीत वृक्षारोपण…
![]()

ब्राम्हणशेवगे येथे पर्यावरण रक्षणाचा अभिनव उपक्रम..
सारीची रक्षा झाडांना देत स्मशानभूमीत वृक्षारोपण…
चाळीसगाव/ प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथील ह.भ.प.वैकुठवासी श्रीधर दला पाटील यांचे वयाच्या ८५ वर्षी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या सारीच्या दिवशी आप्तेष्टांनी स्मशानभूमीत वृक्षारोपण करत रक्षा नदीत फेकून न देता झाडांना देत पर्यावरण रक्षणाचा अभिनव संदेश दिला.
ब्राम्हणशेवगे येथे नेहमीच पर्यावरण रक्षणाचे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.