ब्राम्हणशेवगे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
![]()

ब्राम्हणशेवगे येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
चाळीसगाव /प्रतिनिधी
तालुक्यातील ब्राम्हणशेवगे येथे सालाबादप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास दि.21 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे. या सप्ताहाची सांगता 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या सप्ताहाचे आठरावे वर्ष असून सात दिवस नामांकित किर्तन कारांच्या किर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांना होणार आहे.
याप्रसंगी साहील महाराज, तळेगाव, रवींद्र महाराज गौताणेकर, धनंजय महाराज ब्राम्हणशेवगे,दत्तात्रय महाराज देवळीकर,लिलाधर महाराज, ओझर कर,ज्ञानेश्वर माऊली सिध्देश्वर आश्रम, बेलदारवाडी,गोपाल महाराज डोणगाव कर यांचे काल्याचे किर्तन या सप्ताहाचे प्रसंगी होणार आहे. तसेच गोरख बाजीराव जगताप यांचे दातृत्वाने महाप्रसाद असणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ ब्राम्हणशेवगे यांनी केले आहे.

