1 min read

पालकांनी आपल्या मुलांशी, पाल्यांशी सुसंवादी असावे
डॉ.मिलिंद बागुल

Loading

पालकांनी आपल्या मुलांशी, पाल्यांशी सुसंवादी असावे
डॉ.मिलिंद बागुल
असोदा- कुटुंब संस्था टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या मुलांच्या जगण्याच्या दिशा समृध्द करण्यासाठी सोशल मीडिया सारख्या मायाजालातून बाहेर पडत आपल्या मुलांशी पालकांनी सुसंवाद साधणे आत्यंतिक आवश्यक असल्याचे मत डॉ. मिलिंद बागुल यांनी सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आयोजित पालक शिक्षक संघाच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणाप्रसंगी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की, मुलांना, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सोबतच सामाजिक जडणघडणीच्या दृष्टिकोनातून योग्य मार्गदर्शन होणे काळाची गरज असून महापुरुषांची विचारधारा त्यांना कशी अंगीकारता येईल यासाठी शिक्षकांनी देखील प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. याप्रसंगी विचारमंचावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दिपाली नारखेडे,सचिव वृषाली चौधरी, सहसचिव श्री धोंडू पाटील, पर्यवेक्षक एल.जे.पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडवता येईल या विषयावर पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लिलाबाई पाटील, सविता कापडणे, कैलास वाणी,माधुरी भोळे,अविनाश कोल्हे,दिपाली चौधरी, बिऱ्हाडे ताई या पालकांनीही आपले विचार मांडले. पर्यवेक्षक एल.जे. पाटील यांनी पालकांनी पालक सभेला उपस्थित राहण्यास सोबतच अधून मधून शाळेला भेट द्यावी व आपल्या पाल्याची प्रगती तपासावी असे नमूद केले. प्रज्ञा कापडणे,हेमांगी चौधरी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सभेचे प्रास्ताविक व अहवाल वाचन सचिव वृषाली चौधरी, सूत्रसंचालन मंगला नारखेडे तर आभार भावना चौधरी यांनी मानले. संस्थेचे अध्यक्ष विलासराव चौधरी यांनी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभरातील आयोजित कार्यक्रमात पालकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा ही अपेक्षा, केलेले आवाहन पालकांना अवगत करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापकांनी शाळेतील सर्व वर्ग शिक्षकांचा पालकांना परिचय करून दिला पालक शिक्षक सभेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वसाधारण सभा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *