कळमसरे येथील संतोष उत्तम चौधरी यांचे दीर्घ आजाराने निधन..
![]()

कळमसरे येथील संतोष उत्तम चौधरी यांचे दीर्घ आजाराने निधन..
उद्या 20 आगस्ट , सकाळी 9 वाजता राहत्या घरून निघणार अंतयात्रा
अमळनेर प्रतिनिधी- कळमसरे येथील माळी समाजाचे जेष्ठ नागरिक व मितभाषी व्यक्तिमत्व कळमसरे येथील पुष्पम फोटो स्टुडिओचे संचालक नितीन माळी यांचे ते वडील कै संतोष उत्तम चौधरी यांचे दीर्घ आजाराने आज सकाळी10-30 वाजता
दुःखद निधन झाले.ते 85 वर्षाचे होते.
कळमसरे येथील धार्मिक कामांमध्ये त्यांची नेहमीच उपस्थिती राहत. त्यांचा मित्र परिवाराचा मोठा गोतावळा होता.ते मितभाषी होते, अत्यंत गरीब परिस्थितीतून आपल्या आपल्या मुलांना शैक्षणिक बाळकडू देऊन विविध व्यवसायात त्यांना स्वावलंबी बनवले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलं, सुना, एक मुलगी नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या 20ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता कळमसरे येथून निघेल.
त्यांच्या दुःखात कळमसरे येथील माळी समाज व सर्व ग्रामस्थ मंडळ, शारदा माध्यमिक विद्यालय व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष संचालक मंडळ ,मुख्याध्यापक,शिक्षक वृंद, सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कळमसरे, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ, पोलीस पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी आहेत.

