1 min read

स्वातंत्र्य दिना निमित्त द्रौ.रा. कन्या शाळेची रॅली 

Loading

स्वातंत्र्य दिना निमित्त द्रौ.रा. कन्या शाळेची रॅली 

तिरंगा चौकात अमळनेर नगर परिषदेच्यावतीने सत्कार
 
अमळनेर प्रतिनिधी दि. १५ ऑगस्ट
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा समारोपीय वर्षा निमित्त मेरी माटी मेरा देश उपक्रमांतर्गत श्रीमती द्रौ.रा कन्या शाळेने रॅलीचे आयोजन केले होते.सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील ,जेष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती आठवले यांनी  ध्वजस्तंभाचे पूजन केले. त्यानंतर ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत म्हटले गेले.नंतर करुणा क्लब व शाळेच्या सांस्कृतिक मंडळा तर्फे देशभक्ती पर गीत म्हटले गेले.त्यानंतर तालुकास्तरीय बुद्धीबळ,कॅरम व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनिंचा सत्कार करण्यात आल्यानंतर शाळेतून रॅलीला सुरुवात झाली.  शाळेतून डॉ बाविस्कर यांच्या घराजवळून ,डॉ मुठे यांच्या हॉस्पिटल जवळून महाराणा प्रताप चौक,विजय मारोती मंदिरा, बस स्टँड मार्गे तिरंगा चौकात आले. तिथे नगर परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होऊन पंचप्राण शपथ घेतली त्यानंतर आठवळे बाजारातून परत शाळेत आले. रॅलीमध्ये शालेय दोन्ही सत्राच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग नोंदवीला. विद्यार्थ्यांच्या भारत माता की जय व वंदे मातरम या घोषनांनी अमळनेर शहर दणाणून निघाले. शाळेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिरंगा चौकात अमळनेर नगर परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनीआस्मा पिंजारी,योगिता पाटील यांचा माजी आमदार शिरीष चौधरी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी सत्कार केला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी ,कला शिक्षक एस.एस.माळी,डि एन पालवे, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे उपस्थित होते.शालेय रॅलीचे क्रीडा शिक्षक जे.व्ही. बाविस्कर, श्रीमती आर.एस. सोनवणे यांनी संचालन केले.शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू भघिणी यांनी सहकार्य केले.

फोटो ओळ

नगर परिषदेच्यावतीने पंचप्राण शपथ घेताना अमळनेर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी व नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *