1 min read

मंगरूळ येथे दहावीला प्रथम आलेल्या योगिता पाटील व नेहा पाटील या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण..

Loading

अमळनेर : तालुक्यात मंगरूळ येथे दहावीला प्रथम आलेल्या योगिता पाटील व नेहा पाटील या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर गावातील अग्निवीर म्हणून देशसेवेत गेलेल्या व स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांचा ग्रामविकास शिक्षण मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.
विविध कार्यकारी सोसायटीत देविदास विश्वास पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत माजी सैनिक सयाजीराव गणेश पाटील यांच्या हस्ते , स्व अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात मुरलीधर दंगल पाटील यांच्या हस्ते ,जिप प्राथमिक शाळेत शालेय समिती अध्यक्ष दीपक भगवान पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी श्रीकांत पाटील , संजीव सैंदाने ,अमोल पाटील ,वाल्मिक पाटील ,विश्वास पाटील , चंपालाल शिंदे ,संदीप पाटील , निंबा पाटील ,रतीलाल पाटील ,डिंपल पाटील हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *