दहीवद निमझरी पिंपळी परिसरातील नागरिक व प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी
![]()
दहीवद निमझरी पिंपळी परिसरातील नागरिक व प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी
जळगांव ते गांधली दहीवद मार्ग बस सुरू

अमळनेर प्रतिनिधी-आज दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसापासून रा.प.अमळनेर आगारातून जळगांव ते गांधली व्हाया दहीवद एस टी बससेवा सुरू करण्यात येत आहे .
बससेवेचा वेळ जळगांव येथून सायंकाळी १८.३०वाजेस निघून —१९३५ वा,धरणगाव—-१९५० वा. निमझरी—-२०.००वा.दहीवद—-२०.१०वा.पिंपळी—२०२०वा.गांधलीव येथे पोहचून मुक्कामी राहील तसेच सकाळी गांधली येथून०६.०० वा सुटेल (जळगाव साठीव्हाया दहीवद) ०६.१० वा. पिंपळी—०६.२० वा.दहीवद—०६.३० वा निमझरी—०६.४५वा.धरणगाव—०७.५० वा.जळगाव पोहचेल परत जळगाव येथून सकाळीच पुन्हा गांधली करिता व्हाया दहीवद रवाना होईल. —०८.१० वा जळगाव येथून निघेल —०९.१५ वा. धरणगाव—०९.३०वा. निमझरी—०९.४०वा.दहीवद—०९.५० वा. पिंपळी—१०.०० वा गांधली येथे पोहचेल
पिंपळी दहीवद निमझरी येथील नागरिकांना जिल्हा ठिकाणी जळगाव येथे प्रशासकीय कामासाठी तसेच विद्यार्थ्याना शिक्षणासाठी नागरिकाना वैद्यकीय उपचार साठी सकाळी व संध्याकाळी बससेवेची नितांत आवश्यकता होति याची जाणीव सौ.सुषमाताई देसले पाटील प्रथम लोकनियुक्त सरपंच दहीवद ,संचालिका कृषी बाजार सामिती अमळनेर तसेच विभागीय अध्यक्ष सरपंच परिषद मुंबई याना होती म्हणून त्यानी स्वतः अमळनेर आगार व्यस्थापक श्री पठाण साहेब यांची तीन दिवसापूर्वी सरपंच परिषद चे श्री चंद्रकांत पाटील सरपंच कन्हेरे सौ कल्याणी पाटील उपसरपंच शिरूड व सौ रेखा पाटील ग्रा पं सदस्य दहीवद श्री हिरालाल पवार ग्रा प सदस्य खेडी शेखर पाटिल अमलगांव यांनी भेट घेतली होती व नमूद बस सेवा सुरु करावी याकरिता वेळोवेळी पाठपुरावा करून लेखी निवेदन दिले होते .तसेच निवेदन मा ना श्री अनिलदादा पाटील यानाही दिले होते .निवेदनाची दखल मा ना श्री अनिल दादा पाटील यांनी व श्री महाजन साहेब तसेच विभागीय नियंत्रक जळगाव ,अमळनेर आगार व्यवस्थापक श्री पठाण साहेब व अंमळनेर आगार बस नियंत्रक श्री राजेंद्र पवार साहेब यांनी तातडीने घेतली .बस सेवा दहीवद व परिसरातिल नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली म्हणून सौ सुषमाताई पाटील यांनी सर्व ऐस टी अधिकारी यांचे आभार मानले आहेत .तसेच प्रवाशी बांधवानी, अमृत जेष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, इत्यादी सर्व सुविधांचा लाभ घ्यावा.असे आवाहन सौ सुषमाताई पाटील यांनी केले आहे लवकरच्या चोपडा येथून दहीवद करिता मुक्कामी बस सेवा सुरु होईल त्याबाबतही आगार प्रमुख यानाही निवेदन दिले व मा ना श्री अनिलदादा पाटील यांनी स्वतः संबंधित अधिकारी याना बस सेवा सुरु करणे करिता आदेशीत केले आहे करिता मा ना श्री अनिलदादा यांचेही सौ सुषमाताई पाटील यांनी आभार मानले आहेत…

