जि. प. प्राथमिक शाळा येथे “माझी माती माझा देश अभियान” उत्स्फूर्त प्रतिसादासह संपन्न …
![]()

जि. प. प्राथमिक शाळा येथे “माझी माती माझा देश अभियान” उत्स्फूर्त प्रतिसादासह संपन्न …
बाहुटे येथील जि.प.प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २.० अंतर्गत “माझी माती माझा देश अभियान” बाहुटे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यशस्वीरित्या संपन्न झाले. दिनांक १३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक श्री.तुळशीदास नामदेव पाटील,श्री.लोटन गबा पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दि.१४ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण भारतीय सैन्य दलातील सैनिक श्री.हितेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या मातोश्री श्रीमती.आशाबाई ज्ञानेश्वर पाटील व श्री.महेंद्र चैत्राम पाटील यांचे वडील श्री.चैत्राम उखा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दि.१५ ऑगस्ट रोजी भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. प्रथम ग्राम पंचायत येथील राष्ट्रध्वजाचे पुजन उपसरपंच सौ.सरलाबाई भास्कर पाटील,तर ध्वजारोहण सरपंच सौ.ज्योतीबाई देवानंद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जि.प.शाळेतील राष्ट्रध्वजाचे पुजन श्री.जयराम सम्राट पाटील,तर ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.मनोज मोतिलाल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.तद्नंतर शाळेतील रिदम मनोरे,हेमांगी पाटील,सोनल पाटील,कोमल पाटील,मयुरी पाटील या विद्यार्थींनी देशभक्तीपर भाषणे दिली.विद्यार्थींनीची भाषणे ऐकून ग्रामसेविका सौ.योगिता कुणाल पवार यांनी ५०१ रूपये बक्षिस दिले. यावेळी पाढे पाठांतर स्पर्धेत विजयी ८ विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिस म्हणून पॅड वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी बाहुटे येथील उद्योजक श्री.मनोहर पंडीत पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना शालेय स्कूल बॅग वाटप केले. हैद्राबाद येथील श्री.चंद्रकांत जगन्नाथ पाटील यांनी कंपासपेटी,श्री. अरुण अर्जुन पाटील यांनी ३इन वह्या, मा. उपसरपंच कमलबाई सम्राट पाटील यांनी पेन, तर शिक्षणप्रेमी श्री.सुभाष यशवंत पाटील यांनी पेन्सिल- खोडरबर आदि शालेय भेटवस्तू सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना वाटपाचा कार्यक्रम मोठ्या आनंदात संपन्न झाला.कार्यक्रमाचा दुग्धशर्करा योग म्हणजे आमच्या बाहुटे गावावर अतोनात प्रेम असलेले अहमदाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक श्री.मनोहर पंडीत पाटील यांनी आपले वडील कै.पंडीत नवल पाटील यांच्या स्मरणार्थ २५,००० रुपये किंमतीचे HP कंपनीचे प्रिंटर-स्कॅनर देण्याचे जाहिर केले. यावेळी उपस्थित देणगीदार यांचे सत्कार उपशिक्षक श्री.नंदकिशोर जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.राजेंद्र मनोरे यांनी, तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपशिक्षक श्री.गोरख पाटील मानले.यावेळी अंगणवाडी सेविका सौ.निलीमा पाटील, श्रीमती माया पाटील,सचिन सोनवणे,अजय पाटील,श्री.भिमराव महाराज,काशिनाथ पाटील, श्री.भटुलाल पाटील,प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील श्री.खंडेराव शिंदे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.राहुल पाटील, श्री.किरण देसले,डॉ.दत्तात्रय पाटील, राजवर्धन पाटील,श्री.अतुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

