प्रताप महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा
![]()

प्रताप महाविद्यालयात ७६ वा स्वातंत्र्य दिवस साजरा
अमळनेर : येथील खा.शि मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर येथे आज १५ ऑगस्ट रोजी ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए. बी. जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
“२१ व्या शतकातील शिक्षणातील आव्हाने, संधी आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर त्यांनी भाष्य केले. याप्रसंगी माजी प्राचार्य, डॉ. एस.आर. चौधरी, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. पी.आर.शिरोडे यांच्यासह सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ.जी. एच निकुंभ, डॉ. कल्पना पाटील, डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, डॉ. विजय मांटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. उल्हास मोरे, लेफ्ट. प्रा. प्रमोद चौधरी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्रमुख, प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू, एन सी सी कॅडेट, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, प्रा. वैशाली महाजन , प्रा. अमृत अग्रवाल, प्रा. अर्चना पाटील यांनी केले.

