1 min read

व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Loading

व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी रामवाडी अमळनेर येथे सुरू असलेल्या परिसरातील एकमात्र मान्यता प्राप्त कै. दादासाहेब व्ही एस पवार इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
परिसरातील एक्स आर्मिमन श्री राजेन्द्र यादव (आण्णा मेजर) श्री र‌ऊफ पठाण, श्री. जगदीश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यावर विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य, तसेच स्वातंत्र्यपर भाषणे दिली.
शाळेत झालेल्या विविध स्पर्धा मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
सूत्र संचालन शाळेची विद्यार्थिनी कु भूमिका पाटील हिने केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्य सौ. वर्षा सोहीते, शिक्षिका सौ. योगिता फाळके, स्वाती चव्हाण, मनीषा सोनार, पल्लवी येवले, सौ. संगीता पाटील, सौ. मनीषा शिरसाठ, सौ. सुवर्णा अहिरे, योगिता पाटील, शिपाई सौ. भारती गव्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजन श्री उमाकांत पाटील सर यांनी केले त्यांना शाळेचे चेअरमन श्री. उत्कर्ष पवार व सचिव सौ. अलका पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *