परिश्रम मतिमंद विद्यालय, पारोळा ध्वजारोहण झाले (STI) रविंद्र महाजन यांच्या हस्ते…
![]()


परिश्रम मतिमंद विद्यालय, पारोळा येथे ध्वजारोहण रविंद्र महाजन STI यांचे हस्ते करण्यात आले.
आज दिनांक.१५ /०८/२०२३ रोजी परिश्रम दिव्यांग मुला मुलिंची निवासी शाळा येथे ७७ वा “स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यात आला.ध्वजारोहन श्री.रविंद्र महाजन सर (राज्य कर अधिकारी जळगाव) यांचे हस्ते करण्यात आले.भारत मातेचे प्रतिमा पुजन श्री.योगेश रघुनाथ महाजन सर (अध्यक्ष चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला मुलिंची निवासी शाळा, पारोळा ) यांचे हस्ते करण्यात आले.माझी माती,माझा देश पंचप्रण शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमाला श्री.छोटूलाल शिंदे से.नि.GRPF, श्री कैलास भगवान पाटील,श्री.अरुण एकनाथ सोनवणे सर (मा.मुख्या.कळमसरे हायस्कूल),सौ. छाया अरुण सोनवणे, श्री गुणवंत पाटील सर,श्री.कैलास ओंकार महाजन, श्री गणेश महाजन इ.उपस्थित होते.विशेष विद्यार्थी व शिक्षक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.विशेष विद्यार्थी यांनी समवेत सविता पाटील, वैशाली पाटील, संगीता महाजन मॅडम यांनी अभिनय गीत सादर केले व जगदीश सोनवणे रामकृष्ण शेलकर यांनी देशभक्तीपर नृत्य विद्यार्थ्यांसोबत सादर कवायत प्रताप पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत सादर केली. यावेळी शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेकडून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव श्री रविंद्र महाजन साहेब (एसटीआय) यांच्या हस्ते करण्यात आला. कु वैष्णवी रामकृष्ण शेलकर एन एम एस शिष्यवृत्ती परीक्षा पात्र, डॉ. जयेश कुमार गणेश महाजन एमबीबीएस, डॉ.हिमांशू मनोहर महाजन एमबीबीएस, डॉ.तुषार कुमार राजेंद्र शेलकर एमबीबीएस,चि.कल्पेश रावसाहेब पाटील 12th 82%, कु. नेहा रावसाहेब पाटील BCA 80% , श्री.गौरेश गुणवंतराव पाटील BE che.1st class साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी श्री रवींद्र महाजन सर यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रताप पाटील सर यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

