1 min read

देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…

Loading

देवगांव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल मध्ये स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…

अमळनेर प्रतिनिधी
देवगाव देवळी तालुका अमळनेर येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल येथे १५ आँगष्ट स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला.
अगोदर गावात प्रभात फेरी काढण्यात आली. शाळेचे ध्वजारोहण संस्थेचे संचालक दादासौ राजेंद्र कौतिक पाटील यांनी केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी जयश्री पाटील, श्वेता बैसाणे, वैष्णवी माळी, नेहा बागुल ,धनश्री माळी,आकांक्षा जाधव यांनी ध्वजगीत सादर केले. शाळेचे संचलन स्काऊट शिक्षक एस के महाजन यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी ग्रामस्थ व सर्व शिक्षणप्रेमी विविध संस्थांचे पदाधिकारी यांचे स्वागत केले. यावेळी जेव्हा देवगाव देवळी येथील सर्व ग्रामस्थ मंडळ, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते ,विविध संस्थांचे पदाधिकारी, संस्थेचे संचालक मंडळ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक,व महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *