अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण संपन्न…!
![]()

अँड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे ध्वजारोहण संपन्न…!
विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग…!
विद्यार्थ्यांनी स्कुल युनिफॉर्म मधे वेळेवर येऊन ह्या कार्यक्रमात उत्साहात सहभाग नोंदविला.स्कुलचा फेसबुकवर अकाऊंट वरुन देखील लाईव्ह प्रक्षेपण सुरु होते.सर्वांनी भारत माता की जय,वंदे मातरम च्या घोषणा देत देशभक्तीचा एक अनोखा संदेश दिला. देशभक्तीपर गीते यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. मेरी माती मेरा देश या संकल्पनेने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी भाषणे दिली. विविध कलागुणांनामध्ये पदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविन्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीत मनामधे सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रम प्रसंगी संस्था सचिव प्रा शाम पाटील संचालक पराग पाटील प्रा देवेश्री पाटील प्राचार्य नीरज चव्हाण सर प्रा प्रकाश महाजन सर प्रा आशिष शर्मा उप प्राचार्य अश्विनी चौधरी मॅडम सर यांची प्रमूख उपस्थित होती. कर्यक्रमाचे सुत्रसंचलन विलास पाटील सर व मुस्कान ढिगराई मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक केदार देशमुख यांचे मोलाचे योगदान झाले त्याबरोबर सर्व शिक्षक वृंद पालक व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

