सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार विजय नरवाडे यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान.
![]()


सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार विजय नरवाडे यांना मिळाला ध्वजारोहणाचा मान.
ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) -कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार तथा प्रादेशिक परिवहन कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक विजय नरवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. नरवाडे आपल्या भाषणात म्हणाले मी 24 वर्ष प्रामाणिक देश सेवा केली . आपल्या देशाचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण जिथे जाल तिथे प्रामाणिक सेवा करा विद्यार्थी व नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर अपघात टाळता येतील प्रत्येकाचा जीव हा बहुमूल्य आहे एम. सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी कवायत संचलन करून तिरंगी झेंड्याला सलामी दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले पिरॅमिड व महापुरुषांच्या वेगवेगळ्या वेशभूषेतील लहान विद्यार्थी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.तिसाई मोटार ट्रेनिंग स्कूलचे संचालक निलेश गायकवाड यांच्या सौजन्याने अपघात टाळण्यासाठी विविध घोषवाक्यांचे बॅनर व तिरंगी झेंडे विद्यार्थ्यांच्या हाती देत परिसरात प्रभात फेरी काढली फेरीतून अपघात टाळण्याची जनजागृती केली कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पी.टी. धनविजय माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्रार्थने विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे यांच्यासह पालक प्रतिनिधी व मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते.

