1 min read

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता अंतर्गत”मेरी माटी-मेरी देश” या अभियानात भाऊसाहेब राऊत विद्यालयात विरो को नमन व निबंध, देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा संपन्न :

Loading

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता अंतर्गत”मेरी माटी-मेरी देश” या अभियानात भाऊसाहेब राऊत विद्यालयात विरो को नमन व निबंध, देशभक्तीपर गीतगायन, वक्तृत्व स्पर्धा संपन्न :

भाऊसाहेब राऊत विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता अंतर्गत “मेरी माटी-मेरी देश” अभियानात आज भाऊसाहेब राऊत विद्यालयात आज विरो को नमन तसेच देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी भारतीय सेना दलाचे माजी सैनिक हिरालाल सोनवणे, स्वप्निल तायडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एल एस तायडे ,पर्यवेक्षक एस एम रायसिंग, अरुणकुमार बाविस्कर, प्रमोदिनी बाविस्कर यांची उपस्थिती होती माजी सैनिक हिरालाल सोनवणे यांनी देशभक्ती व आपले अनुभव कथन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख योगराज सोनवणे यांनी केले याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी यांनी देशभक्तीपर विविध गीते सादर केली याप्रसंगी विनोद कोळी, प्रकाश मेंढे, सुवर्णसिंग राजपूत, राजेश जाधव, तुषार भोई, रवींद्र कोळी, धनराज सोनवणे, संगिता शिरसाटे, अंजली पगारे, रतीलाल पाटील, कैलास सपकाळे, राजेंद्र सपकाळे तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *