1 min read

पत्रकार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने हरवलेल्या आजीला मिळाले तिचे कुटुंबीय!

Loading

पत्रकार किशोर पाटील यांच्या प्रयत्नाने हरवलेल्या आजीला मिळाले तिचे कुटुंबीय!
एखादी अनोळखी व्यक्ती आढळली तर तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधा- धर्मराज सोनके
, ठाणे,कल्याण दि.१४(मनिलाल शिंपी) शनिवार व रविवार
सलग दोन सुट्टी असल्यामुळे वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी परिसरात संपूर्ण महाराष्ट्रातील प्रचंड प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.त्यात रविवार असल्यामुळे अजून जास्त प्रमाणात गर्दीचे स्वरूप पाहावयास मिळते, त्यातच भिवंडी तालुक्यातील माणकोली येथून आई वज्रेश्वरी च्या दर्शनासाठी व कुंडामध्ये स्नान करण्यासाठी बारा ते पंधरा जण एका टेम्पो ने वज्रेश्वरी येथे सकाळी आले होते, त्यांच्यासोबत चंपू जगन माळी ही (७५) वर्षाची वृद्ध महिला (आजी) देखील होती.
अकलोली कुंडावर स्नान करून हे सर्वजण वज्रेश्वरी येथील मंदिरात दर्शनासाठी गेले. वज्रेश्वरी आईचे दर्शन झाल्यानंतर आजीची व आजी सोबत आलेल्या कुटुंबीयांची चुकामुक झाली.
आणि आजीची वाट बदलली आजी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एकटी चालत चालत वज्रेश्वरी येथील आसरा नगर येथे पोहीचली. आजी परिसरात नवीन दिसल्याने तेथील महिलांनी माणुसकीचा धर्म जतन करून तात्काळ आजीची विचारपुस केली व वज्रेश्वरी येथील पत्रकार मिलिंद कांबळे यांना फोन करून आजची माहिती दिली. मिलिंद कांबळे यांनी आजीची माहिती घेतली असता आजी ही मानकोली, वळ, ठाकराचापाडा गावातील असून आजीचे नाव चंपू जगन माळी आहे असे समजले. वयोमानाने आजीला आवाज कमी येत होता आजीला तिचे नाव स्पस्ट सांगता येत नव्हते. आजी फक्त माणकोली, वळ, ठाकराचापाडा,गावाचे नाव सांगत होती. त्यामुळे लगेच मिलिंद कांबळे यांनी वळ गावचे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील यांच्याशी संपर्क साधला व आजीचा फोटो त्यांना पाठवला. तसेच गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.धर्मराज सोनके यांना माहिती दिली.व त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ घटनास्थळी पोलीस कर्मचारी पाठवले. पोलीस येईपर्यंत दैनिक
स्वराज तोरण चे संपादक डॉ. श्री.किशोर पाटील यांनी मिलिंद कांबळे यांना फोन केला कि, आजीच्या कुटुंबीयान सोबत संपर्क झालेला आहे त्यांना कोणत्या ठिकाणी पाठवून देऊ. असे सांगताच आजींच्या सोबत गेलेले कुटुंबीय सगे सोयरे यांची भेट झाली, तोपर्यंत मिलिंद कांबळे यांनी आजीबाईंना पोलिसांच्या स्वाधीन केले होते,
त्याचबरोबर ज्या पोलिसांनी आजींना नेले होते त्यांच्याशी संपादक डॉ.किशोर पाटील यांनी संपर्क साधला,व पोलिसांना आजीबाईंची माहिती दिली, त्यानंतर तेथील पोलिसांनी सांगितले की आजीबाई सोबत त्यांची बहीण कुटुंबीय व इतर सगे सोयरे आहेत, ती सर्व मंडळी आता पोलीस स्टेशनला आली आहे,
तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांची ओळख करून आजीबाईंना त्यांच्या स्वाधीन करतो आपण फोन करून सांगितल्यामुळे आपले आमच्या पोलिसांच्या वतीने आम्ही आभार मानतो,
व आपल्या परिसरात एखादी अनोळखी व्यक्ती आढळली तर तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.धर्मराज सोनके यांनी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून समस्त भक्तगण व नागरिकांना केले आहे. तसेच आसरानगर येथील ज्या महिलांनी आजीबाईंना मदत केली त्या सर्व महिलांचे
परिसरातून आभार मानण्यात येत आहेत, तसेंच आजीच्या कुटुंबीयांनी देखील संपादक डॉ.किशोर पाटील व आसरानगर येथील महिलांचे आभार मानले आहेत.व सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी आजी सोबत आलेल्या तिच्या नातेवाईकांनची संपूर्ण चौकशी करून आजीला त्यांच्या स्वाधीन केले.मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी, स्वामीनारायण ट्रस्टचे विश्वस्त डॉ. दिनेश भाई ठक्कर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष सोमनाथ ठाकरे , रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिड टाऊन चे डॉ.किशोर अढळकर , आणि रोटी डे ग्रुप, कच्छ युवक संघ, यांच्याकडून दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,आणि प्रतिनिधी मिलिंद कांबळे यांचा कार्याचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *