1 min read

कलाशाखेच्या विद्यार्थ्याची शिक्षणाची परदेशवारी रानपाखरांसाठी प्रेरणादायी

Loading

कलाशाखेच्या विद्यार्थ्याची शिक्षणाची परदेशवारी रानपाखरांसाठी प्रेरणादायी श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित, सु.अ.पाटील प्राथमिक / यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा पिंपळे बु. ता- अमळनेर जि.जळगाव या ठिकाणी दि.- 12/08/2023 वार- शनिवार रोजी इ.8 वी ते 12 वी तील विद्यार्थ्यांसाठी शालेय गुणवत्ता विकास समितीमार्फत प्रेरणादायी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. आपल्या संस्थेच्या अध्यक्षा माईसो सौ.विद्याताई युवराज पाटील व सचिव आदरणीय नानासो श्री.युवराज पाटील यांच्या प्रेरणेतून विविध शालेय उपक्रम राबविले जातात. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनातून शालेय गुणवत्ता विकास समिती प्रमुख श्री.प्रविण पाटील यांनी उद्बोधन वर्गाचे आयोजन करून उद्बोधन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून चि. दिव्येश राजेंद्र पाटील यांना आमंत्रित केले होते. प्रेरणादायी उद्बोधन वर्गाचे उदघाटन प्राथमिक मुख्याध्यापक .श्री.अविनाश अहिरे व माध्यमिक मुख्याध्यापक श्री.उदय पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्य शिक्षक श्री.भटु वानखेडे यांनी केले. तर प्रमुख मार्गदर्शकाचा परिचय माध्य. शिक्षक श्री. प्रविण पाटील यांनी केला. नंतर चि. दिव्येश पाटील यांनी आपल्या उज्वल यशाचा कानमंत्र आपल्या जीवनप्रवासातून आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगितला. माझे प्राथमिक शिक्षण इयत्ता 4 थी पर्यंत जि. प.शाळा पळासदळे येथे झाले .

इयत्ता 4 थी त असतांना पितृछत्र हरपले, परंतु जिद्द आणि चिकाटी मात्र मी सोडली नाही. आईने अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी करण्याचे ठरवले व पुढील शिक्षणासाठी
साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथे प्रवेश घेतला. घरची साधारण परिस्थिती आईचं अफाट कष्ट ,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील एकही स्पर्धा सोडली नाही. स्पर्धा आणि प्रथम पारितोषिक हे जणू माझे समीकरणच बनले होत इयत्ता10 वी त 96.20% गुणांसोबत उत्तीर्ण झालो. 11/12 वी साठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रातुन
10000 विद्यार्थ्यांपैकी 60 व्या मध्ये आलो. आणि सैन्यदलात अधिकारी बनण्याची तयारी सुरू केली. 12 वी ला असताना (NDA ) NATIONAL DEFENCE ACADEMY च्या परीक्षेत SSB interview क्लिअर करून भारतात 65 रँक सोबत उत्तीर्ण झालो . पण medical कारणामुळे NDA जॉईन करणे शक्य झाले नाही.
त्यानंतर पदवी शिक्षणासाठी Fergusson College pune येथे कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन राज्यशास्त्र विषय घेतला, व gold medalist होऊन 9.8 CGPA गुणांनी उत्तीर्ण झालो. त्यानंनतर भारतातील नामांकित Ashoka University, सोनीपथ हरियाणा येथे young india fellowship ह्या प्रोग्राम साठी भारतातून 100 विद्यार्थ्यामध्ये माझे सिलेक्शन होऊन 11.85 लाखाची scholarship मिळवली.
तिकडे असताना मला Genpact ह्या consulting company ने 13 lakh च्या वार्षिक पगाराची नोकरी प्रदान केली. परंतु पुढे शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यामुळे मी नोकरी न स्वीकारता. अशोका University मार्फत फ्रान्स , PARIS येथे आंतररा्ट्रीय अर्थव्यवस्था या विषयाचा स्टडी करण्यासाठी येत्या 17 तारखेला मी पॅरिस साठी रवाना होणार आहे. हा संपूर्ण आतापर्यंत शिक्षणाचा प्रवास साध्या आणि सोप्या भाषेत ,मार्मिक पद्धतीने आश्रम शाळेतील रानपाखरांना कथन पद्धतीने ,चर्चा करून समजून सांगितला. दिव्येश पाटलाची यशाची कथा त्यांच्या तोंडून एकतांना आश्रम शाळेचे विद्यार्थी एकाग्र झालेले होते. . मी सुद्धा तुमच्यासारख्याच गरीब परिस्थितीतून आलेलो आहे. माझी परिस्थिती हि गरिबीची होती, परंतु माझी शिकण्याची जिद्द होती, म्हणून माझ्या मार्गात, गरिबीची परिस्थिती कधीही आडवी आलेली नाही. माझ्याकडे पैसा नसताना सुद्धा भारतातील नामांकित अशोका विद्यापीठांमध्ये मी शिक्षण घेतले. मार्गदर्शन करतांना सांगितले की, कला शाखेसाठी खुप संधी उपलब्ध आहेत, परंतु आपल्याला माहीत नसल्याने आपण मागे पडतो. शालेय जीवनात संगत फार महत्वाची असते. जीवनात चांगले मित्र व चांगल्या लोकांशी संबंध ठेवावे. आपल्या अंगी नम्रता असेल तर जीवनात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही . माझ्या आतापर्यंत जीवनाच्या प्रवासात खूप चांगल्या लोकांनी व मित्रांनी मदत केली. आपला समाज खूप चांगला आहे, फक्त आपल्याला संधी ओळखता यायला हव्यात. असा प्रेरणादायी प्रवास सांगितला. सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी फलक लेखन श्री. संजु पवार सरांनी केले. आभार प्रदर्शनाची जबाबदारी उच्च माध्यमिक शिक्षक श्री.स्वप्निल एल. पाटील यांनी पार पाडली, तर छायाचित्रांकन उच्च माध्य. शिक्षक श्री. स्वप्निल एच.पाटील यांनी केले.उद्बोधन वर्गासाठी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *