1 min read

गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगाव येथील सकल मराठा समाजा तर्फे तहसील कार्यालयास निवेदन सादर.

Loading

गोंडगाव येथील झालेल्या घटनेचा निषेधार्थ बाभुळगाव येथील सकल मराठा समाजा तर्फे तहसील कार्यालयास निवेदन सादर.

प्रतिनिधी -पी.डी.पाटील

धरणगाव : नुकत्याच गोंडगाव ता. भडगाव येथील झालेल्या घटनेने संपर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट वाहत आहे. गोंडगाव येथील अवघ्या 8 वर्षाची चिमुकलीवर एका विकृत मनोवृत्तीचा नराधमाने अत्याचार करून तिचा खून केला. व तीन दिवस तिचा मृत देह चाऱ्याचा ढिगाऱ्यात लपवून ठेवला. ही घटना ही हृदय हेलावून टाकणारी आहे. अख्खा महाराष्ट्र या घटनेने सुन्न झालेला आहे. या अश्या विकृत वृत्तीच्या नराधमाला फाशी द्यावी या मागणीसाठी पूर्ण देश भरात या घटनेचा निषेधार्थ ठीक ठिकाणी बंद पाळण्यात येत असून शासनाला निवेदने ही दिली जात आहेत. या घटनेने जनतेत संतप्त भावना ह्या निर्माण झाल्या आहेत. चिमुकली कल्यानीच्या आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी देश भरात जोर धरत आहे.
गोंडगाव येथील कल्याणी च्या त्या आरोपी असलेल्या विकृत मनोवृत्ती चां त्या हरामखोर नराधमाला तात्काळ फाशी द्यावी. या मागणी साठी धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील समाज बांधवां तर्फे धरणगाव तहसील कार्यालयास निवेदन हे देण्यात आले. या वेळी शेतकी संघचे चेअरमन नीलकंठ पाटील, भूषण पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, निलेश पाटील , जयसिंग मराठे, प्रवीण पाटील पत्रकार विकास पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *