कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
अशोक पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी….
![]()

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती
अशोक आधार पाटील यांची अशीही सामाजिक बांधिलकी….
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
लोण येथील भूमिपुत्र तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर चे सभापतीदादासाहेबअशोकआधार पाटील यांनी आपला दिवंगत मित्र कै. संभाजी महादू पाटील रा. लोण खुर्द यांचे सुपुत्र चि.गणेश संभाजी पाटील याला नामवंत अशा प्रतापमहाविद्यालयात BCA ला प्रवेश मिळवून दिला .प्रताप महाविद्यालयात BCA हे विनाअनुदानित तत्वावर असल्यामुळे साहजिकच ह्या अभ्यासक्रमाची फिस सुद्धा जास्त आहे. एव्हढी फी भरणे गणेश ला शक्य नव्हते .म्हणून अशोक पाटील यांनी उर्वरित रक्कम आपल्या खिश्यातून देऊन एका हुशार ,होतकरू विद्यार्थ्यास मदतीचा हात दिला. आपल्या ह्या संवेदनशील कृतीतून अशोक दादांनी आपल्या मित्रास खरी आदरांजली वाहिली.
बापूसाहेब अशोक पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सामाजिक, शैक्षणिक कार्याला प्राधान्य देऊन समाजसेवा करीत असल्याचा त्यांच्या मित्रपरिवारांनी भावना व्यक्त केल्या आहेत

