1 min read

फक्त तुझी आठवण

Loading

फक्त तुझी आठवण

फक्त तुझी आठवण
दाटलेली डोळाभर;
हुंदक्याची साठवण
पेटलेली गळाभर !

पाणी तरी पावसाने
पुन्हा पुन्हा टिपायाचे ;
उन्हास ह्या भिऊनिया
किती किती लपायाचे!

वक्षातल्या वणव्यात
सोनचाफा जपताना,
राखेतल्या चांदण्यात
हासलो मी चालताना!

कधीतरी क्षितिजाची
कडी होईलही सैल,
उभा याच आशेवर
खोल उंबऱ्याच्या पैल!

नाही बळ जळायाचे,
नाही बळ विझायाचे,
हाती निखारा घेऊन
एकट्याने भिजायाचे!
***

मौनदाह‘ह्या ‘शब्दमल्हार’ ‘प्रकाशनाने अगदी नुकत्याच प्रकाशित केलेल्या,अतिशय उत्तम निर्मितीमूल्य असलेल्या संग्रहातून. संग्रह सवलतीत नि घरपोच मिळण्यासाठी संपर्क -वेदश्री 9820 72 76 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *