नगावची प्राची भूषण गिरी आज एबीपी माझा लाईव्हवर झळकणार
![]()

नगावची प्राची भूषण गिरी आज एबीपी माझा लाईव्हवर झळकणार. अमळनेर – नगाव ता.अमळनेर येथील सुयोग शिक्षण मंडळाने चालविलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नगाव- गडखांब या विद्यालयाची इयत्ता 6 वी ची विद्यार्थिनी कु.प्राची भूषण गिरी हीची एबीपी माझा लाईव्ह वर आज दि.11 ऑगस्ट रोजी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबई येथे निवड झालेली आहे. ज्ञान की चळवळ, पुणे व एबीपी माझा लाईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सव स्वतंत्र भारत अभिनव पोस्ट कार्ड स्पर्धेत या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तिच्यासोबत समन्वयक शिक्षक म्हणून कैलास सोनवणे यांची निवड झालेली आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मा. दीपक केसरकर, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, प्रदीप लोखंडे उपस्थित राहणार आहेत.या निवडीबद्दल जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, अमळनेर चे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब डॉ एन आर पाटील, प्राचार्य दादासाहेब तुषार बोरसे, विद्यालयाचे सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी या विद्यार्थ्यांनी चे अभिनंदन केलेले आहे

