1 min read

प्रताप महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत वृक्षारोपण

Loading

प्रताप महाविद्यालयात क्रांतीदिनानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान अंतर्गत वृक्षारोपण

अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर संचलित प्रताप महाविद्यालयात
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या “मेरी माटी मेरा देश” या उपक्रमातंर्गत दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना NSS एकक प्रताप महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना NCC बटालियन यांच्या वतीने महाविद्यालयाच्या वसतिगृहासह प्रांगणात वृक्षारोपण करून मातृभूमीला वंदनासह पंचप्रण शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला खा. शि. मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र प्रभाकर देशमुख, सौ. माधुरी पाटील, सचिव तथा प्राचार्य डॉ. ए. बी जैन, सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जी. एच. निकुंभ, डॉ. जे बी.पटवर्धन, डॉ. कल्पना पाटील, प्रा. पराग पाटील, डॉ. विजय मांटे, , डॉ. ए. जे. पाटील, डॉ. विजय तुंटे, प्रा. डॉ. धनंजय चौधरी, प्रा. डॉ. हर्षवर्धन जाधव, प्रा. डॉ. कैलास निळे, डॉ. नलिनी पाटील, प्रा. डॉ. निलेश पवार, डॉ. राजू सरवदे, डॉ. एस. डी. बागूल, डॉ. अमोल मानके, डॉ. संतोष दिपके, डॉ.माधव भुसनार, डॉ. एन. सी. सी प्रमुख लेफ्ट. डॉ. प्रमोद चौधरी, क्रीडा संचालक डॉ. सचिन पाटील, प्रा. पुष्पा पाटील डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. नितेश कोचे, एन. सी सी महिला प्रमुख प्रा. वैशाली महाजन, डॉ. वंदना भामरे, डॉ. जे. टी. साळवे, प्रा. दीपक पाटील, प्रा. बालाजी कांबळे, व इतर विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, छात्र सैनिक तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी भूमातेस नमन व शूरविरांना वंदन करून सामूहिकरित्या पंचप्रण शपथ घेतली. सर्व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *