1 min read

ठाणे जिल्हा कार्यालयास स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग संपन्न

Loading

ठाणे जिल्हा कार्यालयास स्काऊट गाईड उजळणी/माहिती वर्ग संपन्न

मुंबई,ठाणे( मनिलाल शिंपी ):जिल्हा परिषद ठाणे शिक्षण विभाग, प्राथमिक व माध्यमिक आणि भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा ठाणे यांच्या विद्यमाने तालुका वार/क्षेत्रानुसार दिनांक 25 जुलै ते 5 आगस्ट या कालावधीत विविध तालुक्याच्या /क्षेत्राच्या स्थळी एक दिवसीय स्काऊट गाईड माहिती वर्गाचे आयोजन करण्यात आलेले होते . दिनांक 05 ऑगस्ट 2023 रोजी भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय येथे माहिती वर्गाची सुरुवात, ” दया कर दान भक्ती का” या स्काऊट गाईड प्राथनेने करण्यात आली. प्रामाणिकपणा, पर्यावरणमैत्री, बंधुभाव, प्राणिमात्रांवर प्रेम, दररोज एक सत्कृत्य अशा आदर्श नागरिकत्वाच्या ९ नियमांचा स्काऊटमध्ये समावेश आहे. याद्वारे शिस्तप्रिय व सुजाण नागरिक घडविणे हे स्काऊट गाईडचे मुख्य ध्येय आहे स्काऊट गाईड हा विषय प्रत्येक शाळेत आवश्यक आहे. तसेच जास्तीत जास्त प्रसार व प्रचार व्हावा या करिता तसेच माननिय शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी या वर्षी जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त स्काऊट गाईड कब बुलबुल ची नोंदणी व्हावी या दृष्टीने 10 लाख रुपये सेस फंड मंजूर करण्यात आलेला आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील आपल्या मुलांना स्काऊट गाईड च्या माध्यमातून राज्य पुरस्कार ते राष्ट्रपती पुरस्कार मिळवुन देण्याची हि संधी आहे असे प्रतिपादन यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे नवी मुंबई मनपा शिक्षणाधिकारी तथा सहा. जिल्हा आयुक्त गाईड श्रीमती अरुणा यादव यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ लिपीक श्री.संदिप घुसिंगे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा संघटक किरण लहाने यांनी केले, जिल्हा मुख्यालय आयुक्त श्रीमती अल्मेडा मॅडम यांनी स्काऊट गाईड चा इतिहास, उपयुक्तता, याबाबत माहिती दिली तर, जिल्हा संघटक किरण लहाने यांनी प्रशिक्षणाचे टप्पे, संघनायक शिबीर, राज्य पुरस्कार ते राष्ट्रपती पुरस्कार याबाबत माहिती दिली. तसेच नोंदणी व ईतर स्काऊट गाईड संबंधीत विषयाबाबत मार्गदर्शन केले शिक्षकांच्या सर्व प्रश्नाचे निरसन करण्यात आले.
या माहिती वर्गामध्ये खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील तसेच व महानगरपालिकेतील स्काऊटर गाईडर शिक्षकांनी सहभाग नोंदविला. तसेच ऑनलाईन OYMS नोंदणी बाबत कार्यालयांचे वरीष्ठ लिपीक संदीप घुसिंगे यांनी माहिती दिली. या प्रशिक्षण वर्गाकरीता तसेच शासनाने प्रत्येक शाळेत स्काऊट आणि गाईड हा विषय सुरू करण्याबाबत प्रस्तावित असून जास्तीत जास्त शाळेने स्काऊट, गाईड, कब व बुलबुल ची नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हा संघटक स्काऊट किरण लहाने यांनी केले आहे. हे माहिती वर्ग यशस्वीरित्या करण्यासाठी ठाणे भारत स्काऊट गाईडचे कर्मचारी श्री.शिवाजी पार्टे यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीरित्या आपले कर्त्यव्य पार पाडले. शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री किरण लहाने, जिल्हा संघटक स्काऊट यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *