1 min read

नंदगाव येथे प्रतापच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वृक्षारोपण

Loading

नंदगाव येथे प्रतापच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत वृक्षारोपण

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या “मेरी माटी मेरा देश” या कार्यक्रमांतर्गत दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना प्रताप महाविद्यालय अमळनेरच्या वतीने दत्तक गांव नंदगांव येथे दि. ९ रोजी रोजी (७५ रोपांचे) वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.बी.जैन, सहसचिव डॉ. धीरज वैष्णव, उपप्राचार्य डॉ. जे. बी. पटवर्धन, डॉ. डी. आर. चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील राजपूत, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.भाग्यश्री जाधव, श्रीराम मंदिर संस्थान नांदगावचे प. पू. श्री. श्री. १००८ श्री. ईश्वरदासजी महाराज, ग्रामसेवक निलेश साळुंखे, माजी ग्रा. पं. सदस्य पृथ्वीराज रतन पाटील,माजी सरपंच भास्कर दयाराम बडगुजर, रमेश दत्तू पाटील, सफाई कर्मचारी संतोष मांग व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच प्रताप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली. व गावात वृक्षारोपणाची दिंडी काढून पर्यावरपणाचे महत्व पटवून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *