1 min read

स्वातंत्र्यसैनिक नानासो. शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे तर्फे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

Loading

स्वातंत्र्यसैनिक नानासो. शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे तर्फे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
शिरपूर प्रतिनिधी-दिनांक ९/०८/२०२३ क्रांतीदिनाचे औचित्य साधून वरवाडे शिरपूर येथील स्वातंत्र्यसैनिक नानासो. शंकर पांडू माळी प्रतिष्ठान तर्फे किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित क्रांतिवीर शंकर पांडू माळी विद्यालयात १५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भगवान बिरसा मुंडा, थोर स्वातंत्र्यसेनानी कर्मवीर व्यंकटराव रणधीर, क्रांतिवीर शंकर पांडू माळी यांच्या प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक नेते, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव नानासो. निशांतजी रंधे, शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक नानासो. शंकर पांडू माळी प्रतिष्ठान वरवाडे चे अध्यक्ष, मा.वासुदेव शंकर देवरे , शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आबासो. काशिनाथ डिगंबर माळी, मांडळचे माजी सरपंच आप्पासो.भटू नामदेव सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतिवीर शंकर पांडू माळी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. जे.एल.पाटील मॅडम यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयातील सुसज्ज अशी संगणक लॅब, प्रयोग शाळा, दहावी नंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी तज्ञ मार्गदर्शक यांची कार्यशाळा, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी कशा प्रकारे सोडवल्या जातात याविषयी सविस्तर अशी माहिती दिली. यानंतर १५० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
गणवेश वाटपानंतर वाघाडी तंटामुक्तीचे अध्यक्ष मा. श्रीराम माळी, माजी नगरसेवक शामकांत ईशी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिरपूर वरवाडे नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की ज्या विद्यालयास माझ्या वडिलांचे नाव दिले त्या विद्यालयातील खरोखर गरजू विद्यार्थ्यांना आज मी जे काही हे गणवेश दिले हे काम करून मी धन्य झालो यापुढे ही क्रांतिवीर शंकर पांडू माळी विद्यालयास जी काही मदत लागेल ती करण्यास मी तत्पर आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव नानासो. निशांतजी रंधे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की मी आणि वासुदेव देवरे हे क्रांतिवीरांच्या घरात जन्माला आलो हे आमचे भाग्यच समाजकारण करताना आम्ही प्रत्येक समाजातील घटकापर्यंत पोहोचत असतो त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
कार्यक्रमास मा.जयवंत माळी, मा. श्रावण सोनवणे, संत सावता माळी समाज ट्रस्ट सचिव अधिकार माळी, सा.कार्यकर्ता भटू भिवसन माळी,माजी नगरसेवक संतोष माळी,जी.व्ही.पाटीलसर, सा.कार्यकर्ता विनायक कोळी, गव्हमन काॅट्रक्टर नरेंद्र पाटील,कैलास माळी, ईश्वर माळी,भटू दगा माळी, सा.कार्यकर्ता भालेराव माळी, संत सावता माळी समाज ट्रस्ट सदस्य देविदास माळी, श्रीम्हाळसा माता मंदीर ट्रस्ट सदस्य वसंत माळी,पप्पू बारी, पत्रकार सतिष पाटील, एम.जे.माहेश्वरी सर, जय मल्हार हाॅटेल मालक गोपाल ठाकरे, संतोष चिंतामण माळी,पोलिस पाटील कळमसरे विनय माळी, सा.कार्यकर्ता प्रमोद मोतीलाल माळी आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी ९ आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधुन सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विद्यालयातील उपशिक्षक श्री. व्हि.एम.काळे सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *