शासनाच्या नाकर्ते धोरणाच्या विरोधात जळगाव येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन
![]()

शासनाच्या नाकर्ते धोरणाच्या विरोधात जळगाव येथे शिक्षकांचे धरणे आंदोलन.
प्रतिनिधी – जळगाव येथे आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी राज्यातील काम करणाऱ्या कनिष्ठ प्राध्यापक संघटनेने शासनाच्या नाकर्ते भूमिकेच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. त्यांच्या प्रमुख मागण्यां मध्ये प्रतिमहा मिळणारे वेतन दिनांक एक ते पाच तारखेच्या आत मिळावे, सध्य स्थितीत किमान दोन ते तीन महिने प्रत्येक महिन्याचे वेतन 40% अनुदानावर काम करणाऱ्या कनिष्ठ विद्यालयातील प्राध्यापकांची आर्थिक कुचंबना होत असून मुळतः पगार उशिरा मिळतो व त्यांना कुठलेही विमा सुरक्षा नाही, पगार राष्ट्रीय बँकेतून होत नसल्यामुळे अपघाती विमा नाही,जुनी पेन्शन नाही,शासनाकडून मिळणारे अनुदान देखील मिळत नाही, त्याचा हिशोब वर्षभर मिळत नाही. जवळपास अंशतः मान्यता मिळालेल्या कनिष्ठ प्राध्यापकांना 200 शिक्षकांना शालार्थ आयडी मिळाले नाही,40%चा पुढील टप्पा तात्काळ मिळावा, या प्रमुख मागण्यासाठी शासनाच्या निष्काळजी धोरणाच्या विरोधात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून शासनाला इशारा देण्यात आला. तात्काळ धोरणात्मक निर्णय घेऊन प्रमुख समस्या सोडवाव्यात असे निवेदन संघटनेच्या वतीने प्रभारी निवासी जिल्हाधिकारी श्री संजय गायकवाड साहेब यांना अनिल परदेशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक सुनील गरुड सर, शिक्षक नेते संभाजी पाटील सर, प्रा शैलेश राणे सर, दिनेश पाटील, रवी पवार, प्रकाश तायडे, गुलाब साळुंखे, भूषण पवार ,सुधीर शिरसाट ,पराग पाटील, अमृत पाटील,सुनील देशमुख, प्रकाश तायडे,योगेश धनगर,एस.एस. गवाडे ,संजय शांताराम पाटील, रेखा भोळे, प्रीती बोंडे ,वासती डाके,अझहर शेख,विशाल पाटील, अनिल वाघुडे, सुनील तायडे, वसंत गांगुर्डे ,विलास काळे, गुलाब साळुंखे,परशुराम पाटील,अनिल सुर्यवंशी,दिनेश बोरसे या सहसंख्य शिक्षक उपस्थित होते.

