डॉ रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने हेल्थ कॅम्प कोरेगाव भीमा: पेरणे फाटा येथील चंद्रप्रकाश धोका कर्णबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन
![]()


डॉ.रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या वतीने हेल्थ कॅम्प कोरेगाव भीमा: पेरणे फाटा येथील चंद्रप्रकाश धोका कर्णबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रवींद्र भोळे यांनी केले. याप्रसंगी विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे डोळ्यांची तपासणी सुद्धा करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील कर्णबधिर विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ह्या कार्यक्रमाला चंद्रप्रकाश धोका निवासी कर्णबदिल विद्यालयाचे अध्यक्ष श्री सुभाष कट्यारमल, शिक्षक वृंद, विद्यार्थी व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यांग ,अपंग ,मतिमंद, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी डॉ. रवींद्र भोळे अध्यक्ष डॉक्टर मनीभाई देसाई प्रतिष्ठान एनवायके क्रीडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार, नीती आयोग सलग्नित तसेच मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ दिल्ली सलग्नित संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवित असतात.

